राजुरीत एसटी बसेसकडून नियमांचे उल्लंघन

  56

बसस्थानकावर एसटी थांबत नसल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय


पुणे : राजुरी (ता.जुन्नर) येथील बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या कुठल्याही एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी तसेच प्रवाशांनी केली नाराजी व्यक्त केली आहे.
राजुरी येथील गावची लोकसंख्या पंधरा हजारांहुन अधिक असून या ठिकाणी दोन महाविद्यालये तसेच पराशर कृषी पर्यटन केंद्र असल्याने येथील बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते; परंतु बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या कुठल्याही एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी तसेच प्रवाशांनी केली नाराजी व्यक्त केली आहे. राजुरी येथील ग्रामपंचायत व ज्येष्ठ नागरीक संघटनेच्या वतीने माजी सभापती दिपक औटी व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके यांनी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना तसेच कुर्ला आगार, कल्याण आगार, नारायणगाव आगार व शिवाजीनगर आगार प्रमुखांना पत्र देऊन राजुरी या ठिकाणी बस थांबत नसल्याचे पत्र देण्यात आले होते.



त्यानंतर वरील तिन्ही आगार प्रमुखांनी येथील बस स्थानकावर पारनेर, जामखेड, श्रीगोंदा, पार्थडी, कल्याण, ठाणे, मुंबई, नारायणगाव, राजगुरूनगर या डेपोच्या एसटी बसेस या ठिकाणी थांबतील अशा सुचना एस.टी.चालक, वाहक यांना दिल्या होत्या. तसेच या संर्दभाचे पत्र देखील येथील ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात आले होते; परंतु येथील बसस्थानकांवर थांबा परवाना असताना देखील व आगार प्रमुखांनी याबाबतच्या सुचना दिलेल्या असताना देखील एसटी बसेस थांबत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.


दरम्यान येथील ग्रामस्थांनी कल्याण-अहिल्यानगर या मार्गावर राजुरी या ठिकाणी १३ सप्टेंबर २०२४ रोजी ग्रामस्थ व प्रवाशांनी रास्ता-रोको आंदोलन केले होते. त्यावेळी संबंधित आगार प्रमुखांनी यापुढे सर्व बस राजुरी या ठिकाणी थांबतील असे सांगीतले होते. त्यानंतर पुढील काही दिवस सर्व एसटी बसेस थांबत होत्या. मात्र आता पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली आहे.



...अन्यथा लवकरच आंदोलन करू


राजुरी येथील ग्रामस्थ कल्याण या ठिकाणाहून एसटी बसमध्ये बसल्यानंतर त्याला राजुरी या ठिकाणी उतरायचे असेल, तर पुढील बेल्हे गावाचे तिकीट फाडावे लागते व एसटी बस ही राजुरी येथील एसटी स्टँडवर न थांबता ती पुढे काही अंतरावर जाऊन थांबत असल्याचे प्रकार वारंवार होत आहेत. असे प्रकार थांबवावेत तसेच या ठिकाणाहुन जाणाऱ्या सर्व एसटी बसेस थांबविण्यात याव्या, अन्यथा लवकरच कल्याण-अहिल्यानगर या राष्टीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असे सदस्या माजी जिल्हा परिषद, स्नेहल शेळके यांनी म्हटले आहे.



प्रवाशांचे अतोनात हाल


राजुरी या ठिकाणी बस थांबत नसल्याने येथील ग्रामस्थांना, प्रवाशांना आळेफाटापर्यंत तसेच बेल्हा या ठिकाणांपर्यंत खासगी वाहनाने जादा पैसे देऊन जावे लागत होते. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने