पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल पाडले जाणार, कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

पुणे:  तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर (Kundmala Bridge Collapses), पुणे जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील सर्व धोकादायक लहान पूल पाडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांनी केलेल्या ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र गुड्डी यांनी दिल्या असून,  या संदर्भातली बैठक दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.


मावळ येथील इंदुरी कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल रविवारी कोसळला. हा पूल ३० वर्ष जुना आणि गंजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे जिल्ह्यातील गावं आणि वस्त्यांना जोडणाऱ्या सर्व जुन्या लोखंडी पादचारी पूलांची अवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कारण, जिल्ह्यात असे अनेक लोखंडी पूल आहेत, जे धोकादायक स्थितीत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुढे देखील अशी घटना घडण्याचा संभव अधिक असल्यामुळे, हे सर्व धोकादायक पूल पाडण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.


पुणे शहरापासून काही अंतरावर असलेले शांत आणि जास्त वर्दळ नसलेले स्थळ म्हणून कुंडमळा ओळखले जाते. इंद्रायणी नदी आणि कुंडराई देवीचे मंदिर तसेच नजीक असलेले छोटेसे धरण यामुळे कुंडमळाचा निसर्ग पर्यटकांना खुणावत असतो. त्यात रविवारी सुट्टीचा दिवस असल्याकारणामुळे शे-दोनशे पर्यटकांनी  या ठिकाणी गर्दी केली होती. दरम्यान हा दुर्दैवी अपघात घडला.



एकाच वेळी 100 ते 150 पर्यटक पुलावर आल्याने पूल कोसळला


एरव्ही शांतता आणि कमी वर्दळ असलेल्या या ठिकाणी रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. १०० ते १५० पर्यटक पुलावर उभे होते. फोटो काढण्यासाठी पर्यटकांनी पुलावर एकच गर्दी केली होती. त्याचवेळी इंद्रायणी नदीचा प्रवाह देखील प्रचंड होता, शिवाय पूल देखील ३० वर्ष जुना गंजलेल्या अवस्थेमध्ये होता. त्यामुळे, पुलाची क्षमता कमी असल्याने आणि भार अधिक झाल्याने पूल मधोमध तुटून कोसळला. ज्यामध्ये अनेकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, तर काही पूलाखाली अडकून पडले. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर ५१ जणांना वाचवण्यात यश आले. रविवारी रात्री उशिरापर्यंत NDRF व स्थानिक बचाव पथकांकडून बचावकार्य सुरू होते. सोमवारी सकाळपासून ड्रोनच्या मदतीने नदीपात्रात अडकलेल्यांचा शोध घेतला गेला.


Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला