रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये (१७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ७३.७ मिमी, मुंबई शहर ६२.९ मिमी, रायगड ५४.१ मिमी आणि पालघर जिल्ह्यात ४९.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १७ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ७३.७, रायगड ५४.१, रत्नागिरी ४७.७, सिंधुदुर्ग १२.७, पालघर ४९.७, नाशिक ७.७, धुळे ७.१, नंदुरबार ४, जळगाव ६.७, अहिल्यानगर १.१, पुणे ११.९, सोलापूर ०.९, सातारा १९.७, सांगली ६, कोल्हापूर १७.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना ०.१, बीड ०.७, लातूर ०.१, धाराशिव १.६, नांदेड ३.६, परभणी १.७, हिंगोली ३.६, बुलढाणा ३.५, अकोला ८.७, वाशिम ८.५, अमरावती ९.४, यवतमाळ ८.७, वर्धा ७.६, नागपूर ०.९, गोंदिया ०.२, चंद्रपूर ११.९ आणि गडचिरोली जिल्ह्यात ५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.रत्नागिरी येथे मुंबई- गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर १०० मीटर परिसरात भेगा पडल्याने या महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण- चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर वाहतूकीसाठी केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुचाकी व चार चाकी वाहतूक नेरळे- माणगाव- मणेरी- चाफेर-संगमनगर धक्का मार्गे कोयनानगर अशी वळवण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी, स्लॅब पडून दोन व्यक्ती जखमी आणि भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
Comments
Add Comment

भायखळा के पी रोडवर भीषण अपघात पार्सल चा ट्रक उलटला

मुंबई: मुंबईतील भायखळ्याच्या के. पी. रोडवर पार्सलचा ट्रक उलटून अपघात, वाहन चालकाला झोप लागल्यानं अपघात झाल्याची

मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल पाडणार... आता पुढे काय?

स्थानिक लोकांचा जोरदार विरोध, पुनर्वसनाच्या मागणीवर भर मुंबई: मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

नेव्हल परिसरातील रायफल चोरी प्रकरणात ट्विस्ट; आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतात

मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने 'नेवी नगर रायफल चोरी' प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आरोपी

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

सीएटने सर्व टायरच्या किमती केल्या कमी मुंबई : भारत सरकारने अ