पालखी महामार्गावरील अपघातात एक महिला ठार; सहाजण जखमी

सोलापूर : नातेपुते शहराच्या पश्चिमेस श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील समाधान ढाब्याजवळ व्हॅनचा टायर फुटल्याने व्हॅन रस्त्यावर उभ्या असलेला कंटेनरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली असून, सहाजण जखमी झाले आहेत.


हडपसर (पुणे) येथील रहिवासी पाहुण्यांच्या लग्न समारंभासाठी अकलूजला आले होते. लग्न समारंभ झाल्यानंतर ते अकलूजहून नातेपुते मार्गाने हडपसरला निघाले होते. त्याचवेळी व्हॅनचा (एमएच १२- पीएन ५३५१) टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून समोरच उभ्या असलेल्या कंटेनरला (आरजे १९- जीएच ३०७२) जोरदार धडक दिली.



यामुळे गाडीमधील छाया नंदकुमार सपकाळ (वय ६०) या जागीच ठार झाल्या तर स्वप्नील संजय जगताप (वय ३२), सुरेखा संजय जगताप (वय ५०), तुकाराम शांताराम जगताप (वय ५०, रा. बेलसर, ता. पुरंदर), रतन बाळासाहेब दिवसे (रा. सासवड), हेमा सुधाकर आरते (वय ४५, रा. हडपसर), गणेश संपत भंडळकर (वय ५०, रा. कोथळे) हे जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या