VI Breaking News: वोडाफोन आयडीयाचे अस्तित्वच धोक्यात कंपनीकडे थकबाकी द्यायलाही पैसे नाहीत !

प्रतिनिधी: वोडाफोन आयडिया (VI) चे भविष्य धोक्यात आले आहे का? अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. सध्या वोडाफोन आयडिया आर्थिक संकटातून मार्गक्रमण करत आहे. यामुळे वोडाफोन आयडिया स्पेक्ट्रम वापर शुल्कावरील थकबाकी माफ न झाल्याने व्होडाफोन आयडिया (VI) ला टेलिकॉम ऑपरेटरच्या आर्थिक व्यवहार्यतेबद्दल चिंता आहे. आर्थिक संकटात जात असल्याने सरकार वोडाफोन आयडियाला 'रिलीफ पॅकेज ' देण्याच्या तयारीत असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.


दिलेल्या वृत्तानुसार, सरकारचे म्हणणे आहे की, सरकारचा वीआयवर नियंत्रण करण्याचे लक्ष नाही. अँरियरच्या बदली ४९ टक्क्यांहून अधिक इक्विटी समभाग (Equity Shares) विकत घेण्याचा सरकारचा कुठलाही इरादा नाही असा संदेश सरकारने याप्रसंगी दिला आहे. सध्या सरकार वीआयची आर्थिक परिस्थिती टाळ्यावर आणण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत आहे. असे असले तरी वीआय २० वर्षातील थकित अँरियरच्या (Arrears) मधून पैसे देऊ शकेल का किंवा कंपनीच्या इतर उत्पन्न साधनातून पैसे देऊ शकतील का असे असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. अजून सरकारने यातील कुठलाही मार्ग अंतिम असल्याची पुष्टी दिलेली नाही. कंपनीच्या गेल्या काही वर्षांत कॅश फ्लो (Cash Flow) मध्ये होणारी घट पाहता कंपनीच्या आर्थिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.


याशिवाय सरकारने सांगितल्याप्रमाणे ' कंपनीकडे २०२८-२९ पर्यंतच पुरेशी कॅश फ्लो उपलब्ध आहे.' त्यानंतर जर पुरेसा निधी नसल्यास कंपनीला दैनंदिन कामाकरिताही संकटाला तोंड द्यावे लागू शकते.विशेष म्हणजे, व्होडाफोन आयडिया च्या सीईओ अक्षया मुंद्रा यांनी गेल्या महिन्यात दूरसंचार विभागाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, 'भारत सरकारच्या (एजीआर) एजीआरवर वेळेवर पाठिंब्याशिवाय, व्हीआयएल आर्थिक वर्ष २६ नंतर काम करू शकणार नाही जर बँक निधीच्या चर्चा पुढे जाणार नाहीत'.डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (Department of Telecommunication) कडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२६ पर्यंत कंपनीला १८०६४ कोटींची थकबाकी देणी भरायची आहेत. मात्र जरी ती भर ली तरी पुढील वर्षापर्यंची देणी (Liability) देणे कंपनीला अशक्य आहे.


प्रसारमाध्यमांच्या रिपोर्टनुसार जरी कंपनीला थोडी सरकारने देणी माफ केली तरी आर्थिक वर्ष २०२७-२०२८ नंतर कंपनीकडे त्यापुढील पैसे भरण्यासाठी निधीची कमतरता असू शकते. जानेवारी ते मार्चपर्यंत कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला होता. कंपनीचा निव्वळ तोटा (Net Profit) हा ७१६६ कोटी इतका होता. यापूर्वी मे महिन्यात न्यायालयात देखील वीआयने याचिका दाखल करत भाष्य केले होते की, बँकेच्या निधी न मिळाल्यास येणाऱ्या आर्थिक वर्षात आम्ही ऑपरेट करू शकत नाही.

Comments
Add Comment

मोदी सरकारचा मोठा 'मास्टरस्ट्रोक'! महाराष्ट्रासह चार राज्यात रेल्वे ट्रॅकची क्षमता वाढणार; २४,६३४ कोटी मंजूर!

'४१% रेल्वे वाहतूक' असलेल्या कॉरिडॉरला ४ ते ६ लेनमध्ये विस्तार; वाहतूक खर्च होणार कमी नवी दिल्ली : केंद्रीय

WeWork IPO Day 3: We Work India IPO गुंतवणूकदारांचे पैसे पाण्यात? वादग्रस्त आयपीओला अखेरच्या दिवशीही 'या' कारणामुळे घोर निराशा

मोहित सोमण:वर्कस्पेस सोल्यूशन्स प्रदाता वीवर्क इंडिया (WeWork India) मॅनेजमेंट लिमिटेडला त्यांच्या ३००० कोटी

Stock Market: सलग चौथ्यांदा शेअर बाजारात वाढ, मिड कॅप शेअर्सने बाजाराला तरले तर उर्वरित एफएमसीजी, पीएसयु बँक, मिडिया निर्देशांकाने घालवले !

मोहित सोमण:अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स १३८.५९ अंकाने उसळत ८१९२८.७१

आजचा दिवस पीएम मोदींसाठी खास महत्वाचा! 'त्या' शपथविधीला २५ वर्षे पूर्ण

देशाला 'विकसित भारत' बनवण्याचा संकल्प; जुना फोटो केला शेअर मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर २४

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई:

फडणवीस सरकारच्या २ सप्टेंबरच्या GR ला स्थगिती देण्याची मागणी कोर्टाने फेटाळली, मराठ्यांना दिलासा

मुंबई : ठोस पुरावे सादर केल्यास त्यांची छाननी करुन खात्री पटल्यानंतर संबंधित मराठा व्यक्तीला कुणबी असल्याचे