Stock Market: मागील आठवड्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची बाजारात ३३४६.९४ कोटींची गुंतवणूक 'ही ' होती कारणे

प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीत अस्थिरता आहे मात्र परदेशी गुंतवणूकीत विपरित परिस्थिती दिसून आली आहे. एनएसडीएल (NSDL) ने दिलेल्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मागील आठवड्यात ३३ ४६.९४ कोटींची गुंतवणूक केली आहे. रेपो दर (Repo Rate) मध्ये आरबीआयने कपात केल्यानंतर मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीचा ओघ भारतात येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दर ६.% वरून ०.५० बेसिस पूर्णांकाने कपा त करुन रेपो दर ५.५०% पर्यंत खाली आणला होता. परिणामी बाजारातील तरलता (Liquidity) वाढली तसेच अर्थव्यवस्थेला चालनाही मिळाली होती. मोठ्या प्रमाणात चलन पुरवठ्यात वाढ झाल्याने बाजारातील ग्राहकांची क्रयशक्ती वाढत आहे यामुळेच सकारात्मक वातावरणात परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात गेल्या आठवड्यात मोठी गुंतवणूक केली आहे.


वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, ७ ते १३ जून कालावधीत बाजारात परदेशी गुंतवणूकीचा ओघ भारतात आला होता. यांचा फायदाही बाजारात मिळाल्याने सुरुवातीला बँक निर्देशांकात वाढ झाली होती. असे असले तरी शुक्रवारी मात्र परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) ने ३२७५.२६ कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावात गुंतवणूक न करता सोने चांदीत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांनी कल दि ला.


या आधी मे महिन्यात या परदेशी गुंतवणूकदारांनी १९८६० कोटींची गुंतवणूक केली होती ज्यामुळे बाजारात मोठी 'बूम' पहायला मिळाली होती. मे मध्ये वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक झाली होती. मात्र चीन अमेरिका यांच्यातील टेरिफ चर्चा, इराण इस्त्राईल संघर्ष, युक्रेन रशिया युद्ध या कारणांमुळे मध्यपूर्वेतील दबाव कायम राहिला. परिणामी जागतिक बाजारपेठेत गुंतवणूक काढून घेण्याकडे कल अधिक राहिला होता. पुरवठ्यातील व्यत्ययाबद्दल नवीन चिंता निर्माण झाल्यामुळे, काही महिन्यांपासून असलेली स्थिरता भंग पावल्याने तेलाच्या किमतीही प्रति बॅरल ७६ $ च्या वरच्या पातळीवर गेल्या आहेत. मे महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी ३९७३ कोटींचे समभाग विकले होते याशिवाय जानेवारी फेब्रुवारी महिन्यात ७८ व ३४ हजार कोटींहून अधिक समभागांची बाजारात विक्री केली होती.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

अरबाज खान झाला बाबा, पत्नी शुरा खानने दिला मुलीला जन्म

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना रविवारी मुलगी झाली. ५८ व्या वर्षी अरबाज

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

ड्रायव्हरने फरहान अख्तरला घातला १२ लाखांचा गंडा, जाणून घ्या अधिक माहिती...

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याची आई हनी इराणी यांच्या ड्रायव्हरने पेट्रोलच्या नावाखाली तब्बल १२ लाखांचा चुना

'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात

मुंबई : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच कोकण हार्टेड गर्ल

“जॉली एलएलबी ३” ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; अर्शद वारसी आणि हुमा कुरेशीसाठी ठरतोय गेमचेंजर

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट प्रेक्षकांकडून भरभरून