नवविवाहित जोडप्याचा गॅस गिझरच्या लिकेजमुळे दुर्दैवी अंत

कोल्हापूर : कोल्हापूर मधील आजरा तालुक्यात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या जोडप्याचा गॅस गिझरच्या लिकेजमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सागर सुरेश करमळकर (वय ३२) व सुषमा सागर करमळकर (वय २६) अशी या नवदांपत्यांची नावे आहेत. महिनाभरापूर्वी लग्न झालेले करमळकर दाम्पत्य हे फिरण्यासाठी आंबोली येथे गेले होते. आंबोलीहून परतल्यानंतर भावेश्वरी कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घरामध्ये त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे .



सागरचे मित्र त्याला वारंवार फोन करत होते परंतु फोन उचलला जात नव्हता. कालांतराने फोन स्विच ऑफ झाल्याने मित्र परिवाराने सोमवारी सकाळी त्यांच्या घरी भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता गॅस गिझरचा गॅस लिकेज होऊन बाथरूममध्येच त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. घरामध्ये सर्वत्र गॅसचा वास होता. त्यामुळे गॅस लिकेजनेच सदर मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात होती. मोठा मित्रपरिवार असणाऱ्या सागरच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.

Comments
Add Comment

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक