मोघरपाडा येथे एमएमआरडीए उभारणार जागतिक दर्जाचा मेट्रो कार डेपो

मेट्रो मार्गिका ४, ४ ए, १० व ११ चे संचालन, देखभाल येथून होणार


मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय संचालन व देखभाल केंद्र असून, सीएसएमटी ते मीरा रोड दरम्यान एकूण ५५.९९ किमीच्या मेट्रो मार्गाचे संचालन येथून होईल.


सर्व्हे क्रमांक ३०मधील ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या १६ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार एमएमआरडीएला 'आहे त्या स्थितीत' हस्तांतरित करण्यात आली असून महत्त्वाच्या सार्वजनिक परिवहन पायाभूत सुविधेला प्राधान्य देण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेचे हे द्योतक आहे.


मोघरपाडा मेट्रो डेपो हे मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक महत्त्वाचे नियंत्रण व देखभाल केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून अखंडित आणि उच्च दर्जाची सेवा सुनिश्चित करण्यात येईल. या डेपोच्या माध्यमातून प्रामुख्याने खालील जबाबदाऱ्या पार पाडण्यात येतील.


ट्रेन व डेपो प्रणालींचे कामकाज सुरळीत करण्यासाठी ऑपरेशन कंट्रोल सेंटर आणि डेपो कंट्रोल सेंटर यांच्यामार्फत एकात्मिक नियंत्रण कार्यप्रणाली मोघरपाडा डेपोमध्ये पुढील घटक असतील १)मोठ्या देखभालीसाठी १० वर्कशॉप ट्रॅक २)दैनंदिन आणि नियमित तपासणीसाठी १० निरीक्षण ट्रॅक ३) रात्री गाड्या उभ्या करण्यासाठी ६४ स्टेबलिंग ट्रॅक ४)चाकांचे प्रोफाइलिंग करण्यासाठी अंडर-फ्लोअर व्हील लेथ ५)गाड्यांची नियमित स्वच्छता करण्यासाठी ऑटो आणि उच्च क्षमता असलेली वॉश यंत्रणा ६)अंडरफ्रेम व छतावरील उपकरणांवरील धूळ काढण्यासाठी ब्लो-डाऊन प्लांट कॅटेनेरी वाहने उभी करण्यासाठी व देखभालीसाठी सीएमव्ही वर्कशॉप संचालनासाठी डेपो कंट्रोल सेंटर (डीसीसी) आणि प्रशिक्षण कक्ष निर्धारित निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

एमएमआरडीएच्या २७६ व्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यानुसार एमएमआरडीएने ९०५ कोटींचे (सर्व करांसह) कंत्राट मे. एसईडब्ल्यू–व्हीएसई जॉइंट व्हेंचरला दिले आहे. मोघरपाडा डेपो ही 'महत्त्वाची शासकीय प्राथमिकता' असून, मुंबईच्या एकात्मिक शहरी वाहतूक धोरणातील एक प्रमुख केंद्रबिंदू आहे.

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

खोल समुद्रातील मासेमारीसाठी १४ सहकारी संस्थांना अद्ययावत समुद्री नौका

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर