कामाचा आदेश निघताच पाच दिवसात कुंडमळाचा जुना पूल कोसळला

  53

पुणे : कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवर असलेला पादचारी साकव कोसळून भीषण दुर्घटना घडली. ३५ वर्षे जुना असलेला हा पूल कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. पुलाची मुदत संपल्यानं तो दळणवळणासाठी धोकादायक बनला होता. या पुलाचा वाहतूकीसाठी वापर करू नये अशा सूचना सातत्याने दिल्या जातात. पण शॉर्टकट असल्यानं या पुलाचा वापर केला जात होता.


साकव ३५ वर्षे जुना झाल्यानं नव्या पुलाचा प्रस्ताव देण्यात आला होता. ग्रामस्थांकडून नव्या पुलाच्या उभारणीची मागणी होत होती. डिसेंबर २०२२ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नव्या पुलाचा प्रस्ताव सादर करावा अशी सूचना केली होती. त्यानंतर ११ जुलै २०२४ रोजी साडे आठ कोटी रुपये खर्चाच्या जोड रस्त्यासह मोठ्या पुलाला मंजुरी मिळाली होती. इतकंच नव्हे तर नव्या पुलाच्या कामाचा निधी आल्यानंतर त्याचं काम सुरू करण्यासाठी आदेशही निघाला होता. आदेश निघाल्यानंतर पाचच दिवसात हा पूल कोसळून ही दुर्घटना घडलीय. नव्या पुलाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी ८ कोटी निधी दिला जाणार आहे. साकव पुलाजवळच नवा पूल उभारण्याचं नियोजन होतं. हा प्रस्तावित पूल १७० मीटर लांब आणि ७.५ मीटर रुंदीचा असणार आहे. या पुलाचा कार्यरंभ आदेश काढण्यात आल्याच्या पाच दिवसातच जुना पूल कोसळला आहे. जुन्या पुलासाठी २० लाखांचा खर्च करण्यात आला होता.

Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने