Gold Silver Rate Today: आज सोनेचांदीच्या वाढीला किरकोळ ब्रेक 'या' कारणांमुळे किरकोळ घट !

प्रतिनिधी: सलग चार वेळा नव्या उच्चांकावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात आज किरकोळ घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव परिस्थितीत वाढलेल्या सोन्याच्या व चांदीच्या मागणीमुळे सोने चांदी सतत वाढत होते. आज काही प्रमाणात सोने स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 'गुडरिटर्न्स ' या संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोने प्रति ग्रॅम १७ रूपयांनी घसरत १०१५१ पातळीवर पोहोचले आहे. तर २४ कॅरेट प्रति तोळा किंमत १७० रुपयांनी कमी होत सोने दर १०१५१० रुपये झाला आहे.


२२ कॅरेट सोन्याची किंमतदेखील १५ रुपयांनी ग्रॅममागे घटली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम किंमत ९३०५ रूपयांवर पोहोचली. तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत १५० रूपयांनी घटत ९३०५० रूपयांवर पोहोचली आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत १२ रूपयांनी घसरत ७६१४ रूपयांवर तर प्रति तोळा किंमत १२० रुपयांनी घटत ७६१४० रूपयांवर पोहोचली आहे.


एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) सोने निर्देशांकात ०.०९% वाढ होत सोन्याची पातळी १००३६३.०० रूपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही गोल्ड फ्युचर (Gold Future Index) निर्देशांकात ०.१९% किरकोळ घट झाली आहे.


चांदीच्या दरातही घसरण !


चांदीच्या निर्देशांकात देखील मागील आठवड्यात चढउतार पहायला मिळाली होती. शुक्रवारी चांदीच्या दरात कुठलाही बदल झाला नव्हता. आज चांदीच्या किंमतीतही किरकोळ घसरण झाली आहे. प्रति ग्रॅम चांदीची किंमत ०.१० पैसे घट झाली आहे. तर प्रति किलो किंमत १०० रूपयांनी कमी होत १०९९०० रूपयांवर पोहोचली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या निर्देशांकात ०.१४% घसरण झाली असून चांदीची कमोडिटी बाजारात किंमत १०६३४०.०० रुपयांवर पोहोचली आहे. गे ल्या दोन आठवड्यात बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या व चांदीच्या मागणीत वाढ होत आहे. कच्च्या तेलाच्या मागणीबरोबरच सोने चांदी वाढल्याने भारतीय बाजारात किंमती वाढत आहेत असे असतानाच आता इस्त्राईल व इराण युद्धात लोकांची अधिकची तेलात असल्याने सोने मागणी काही प्रमाणात स्थिरावल्याची परिस्थिती वाटत आहे. विशेषतः सोने चांदीच्या खरेदीत घट होत असल्याने निर्देशांक स्थिर राहण्यास मदत होते आहे. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाची ६ पैशाने घसरण झाल्याने बाजारात ही उद्यापर्यंत पातळी कायम राहिल का हा प्रश्नचिन्ह आहे.


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वाढत्या तणावासाठी इराणला जबाबदार धरले. याव्यतिरिक्त, अमेरिकेतील मंदावलेल्या चलनवाढीच्या आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा बाजारात गुंतवणूकदारांना आ हे. ज्यामुळे सोन्याच्या किमतींत आणखी वाढ होण्यास मदत झाली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, २०२५ च्या पहिल्या तिमाहीत जागतिक सोन्याची मागणी १% वार्षिक वृद्धीसह १,२०६ मेट्रिक टन झाली, जी गुंतवणूक मागणीत १७०% वा ढ झाल्यामुळे झाली. याउलट, वाढत्या किमतींमुळे दागिन्यांची मागणी २१% कमी झाली आणि मध्यवर्ती बँकेची (RBI) ची सोने खरेदी २१% कमी होऊन २४३.७ टन झाली आहे.


आज पुणे व बडोद्याचा अपवाद वगळता मुंबईसह इतर मुख्य शहरातील सोने १०१५१ रूपये प्रति ग्रॅम दराने विकले जात आहे. तर चांदीची प्रति किलो किंमत मुंबईत १०९९०० आहे तर पुण्यातही १०९९०० रूपये आहे.

Comments
Add Comment

Kotak Q2FY26 Results: बड्या खाजगी कोटक महिंद्रा बँकेचा तिमाही निकाल आत्ताच जाहीर- अतिरिक्त तरतुदीमुळे केल्याने एकत्रित करोत्तर नफ्यात ११% घसरण

मोहित सोमण: काही क्षणापूर्वी देशातील बडी खाजगी बँके कोटक महिंद्रा बँकेने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे.

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

REIL: रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडची भारतातील एआय इकोसिस्टिम उभारण्यासाठी मोठी घोषणा

मोहित सोमण: रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडने आज मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण उपकंपनी

किया इंडियाने कारची वॉरंटी ७ वर्षांपर्यंत वाढवली

मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्‍हरीच्‍या

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून रशियन तेल आयात कपातीविषयक मोठे स्पष्टीकरण अद्याप सस्पेन्स कायम !

मोहित सोमण:रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या रशियन कच्च्या तेलाच्या आयातीत कपात करण्याचे ठरवले अशी माहिती

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात