सर्वात मोठी बातमी WPI News : १४ महिन्यातील महागाईत सर्वाधिक घसरण! किरकोळ महागाईनंतर घाऊक महागाईतही 'इतक्या' टक्क्याने घट

महागाई कमी करण्यात मोदी सरकारला यश !


प्रतिनिधी: नुकताच भारत सरकारचा घाऊक महागाई निर्देशांक (Wholesale Price Index WPI) तात्पुरता डेटा जाहीर झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार भारताच्या घाऊक महागाई किंमत (Wholesale Inflation Price) मे महि न्यात ०.३९% घटली आहे. सकारात्मक अर्थव्यवस्थेतील चालनेमुळे बाजारातील घाऊक किंमत नियंत्रित ठेवण्यास भारताला यश आले आहे. एप्रिल महिन्यातील तुलनेत घाऊक किंमत निर्देशांक (WPI) ०.८५% खाली आला आहे. भारतीय वा णिज्य व उद्योग मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीत म्हटल्याप्रमाणे, फेब्रुवारी व मार्च महिन्यात अनुक्रमे २.५१% व २.३८% महागाई दर होता. गेल्या १४ महिन्यातील घाऊक महागाईतील सर्वाधिक घसरण झाली आहे.


मुख्यतः एप्रिल महिन्यातील महागाई दर हा अन्न, इलेक्ट्रिसिटी, इतर उत्पादने, केमिकल, दळणवळण या क्षेत्रातील झालेल्या दरवाढीमुळे झालेली असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. मात्र प्राथमिक वस्तू, इंधन, उर्जा यामधील निर्देशांकात घट झाल्याने बाजारात किंमतीचा निर्देशांक घटण्यास मदत झाली आहे. प्राथमिक वस्तूतील एप्रिल महिन्यातील १.४४% महागाईच्या तुलनेत मे महिन्यात २.०२% घट झाली आहे. उर्जा व इंधन यामध्ये एप्रिलमधील २.१८% तुलनेत मे महिन्यात २.२७% महागाई निर्देशांकात घट झाली आहे. उत्पादित वस्तूत (Manufacturing Commodities) मध्ये एप्रिलमधील २.६२% तुलनेत निर्देशांकात घट होत मे महिन्यात २.०४% पातळीवर पोहोचली आहे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) प्रामुख्याने चलनविषयक धोरण तयार करताना किरकोळ महागाईचा विचार करते. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात किरकोळ महागाई सहा वर्षांपेक्षा सर्वाधिक कमी म्हण जे २.८% आहे, मुख्यतः प्राथमिक अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे किंमत आटोक्यात येणे शक्य झाले आहे. महागाई कमी होत असताना आरबीआयने या महिन्यात बेंचमार्क वित्तीय पतधोरण धोरणात व्याजदरात ०.५० बेसिस पूर्णांका ने घट करून ६% वरून ५.५० टक्क्यांवर रेपो दर (Repo Rate) आणला होता. यांचा एकत्रित परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसत आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज ४ टक्क्यांच्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा ३.७ टक्क्यांनी कमी केला आहे, कारण आंतरराष्ट्रीय वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे कोअर महागाई सौम्य राहण्याची अपेक्षा बाजारातील तज्ञांना आहे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) प्रामुख्याने चलनविषयक धोरण तयार करताना किरकोळ महागाईचा विचार करते. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यात किरकोळ महागाई (Retail Inflation) सहा वर्षांपेक्षा सर्वांत कमी म्हणजे २.८२ टक्क्यांवर आली आहे. कारण आंतरराष्ट्रीय वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे कोअर महागाई सौम्य राहण्याची अपेक्षा आहे. किरकोळ महागाईतही अन्नधान्य महागाई कमी झाली, ती ०.९९ टक्क्यांपर्यंत घसरली होती. ऑक्टोबर २०२१ नंतरची ही सर्वात कमी पातळी गाठली आहे. देशभरातील वाढत्या कृषी उत्पादनामुळे अन्नधान्य महागाईत घट होण्याचा हा सलग सातवा महिना आहे.


आजच्या घाऊक महागाई किंमतीतील आकडेवारीनुसार डाळींच्या किमतीत दरवर्षीच्या तुलनेत १०.४१%, भाज्यांमध्ये २१.६२% आणि बटाट्यांमध्ये २९.४२% घट नोंदवण्यात आली आहे. मे महिन्यात, बिगर-खाद्य वस्तूंच्या (Non Food Commodities) किमती १.५३% वाढल्या, तर कच्च्या (Crude) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या किमती १२.४३% घसरल्या आहेत.


मागील आठवड्यातील आलेल्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई दर एप्रिलमध्ये ३.१६ % आणि गेल्या वर्षी मेमध्ये ४.०८% होता जो इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २.८२% पर्यंत कमी झाला आहे.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी, रशियाने विकसित केली कॅन्सरला हरवणारी लस

मॉस्को : कर्करोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हा आजार झाला की रुग्ण आणि त्याचे नातलग निराश होतात. हे नैराश्यच अनेकदा

भटक्या कुत्र्यांची दहशत; महिलेवर जीवघेणा हल्ला, ज्येष्ठ नागरिकाला आणि चार मुलांना केले जखमी

बंगळुरू : कर्नाटकमधील होन्नाली तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. तुमकुरु जिल्ह्यात गुब्बी

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' जाहिराती मित्र पक्षाच्या एका मंत्र्याने दिल्या, रोहित पवारांचा दावा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ठिकठिकाणी पोस्टर

आमदार गोपीचंद पडळकरांनी मनोज जरांगेंना धमकावले

पुणे : धनगर समाजाबाबत मनोज जरांगे यांनी वापरलेल्या अपशब्दांचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र निषेध केला.

मंगळवारपासून सुरू होणार आशिया चषक क्रिकेट स्पर्धा, कधी होणार भारताचा पहिला सामना ?

अबुधाबी : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धा मंगळवार ९ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का होतोय उशीर ?

मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन