BEST Bus Accident : मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस ५ फूट खोल खड्ड्यात गेली अन्…

मुंबई : मुंबईमधून गिरगाव परिसरात मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बसचा अपघात झाला आहे. गिरगाव येथील मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बस खड्डयात पडली आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. पण बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही बेस्ट बस ५ फूट खोल खड्ड्यात गेली आणि त्यामुळे रस्ताही मोठ्या प्रमाणात खचल्याचे पाहायला मिळाले. या बेस्ट बसचा खड्ड्यात पडल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी सकाळी ९.०० ते ९.३०च्या सुमारास ही घटना घडली. गिरगाव चौपाटीजवळील मेट्रोच्या कामासाठी रस्त्याखाली खोदकाम सुरू असताना बेस्ट बस त्या मार्गावरून जात होती. मेट्रोच्या कामामुळे रस्त्याचा काही भाग खचलेला होता. याच खड्ड्यात बसचा मागील भाग अडकला आणि हा अपघात झाला.



दरम्यान, सिमेंटचे रस्ते जे बांधले गेले त्या रस्त्याला बेस द्यायचं असतो. पण टेक्निकली गोष्टी घाईघडबीत झाल्या आहेत. रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कंत्राटदाराला घाईघाईत काम करायला लावले आणि निकृष्ट दर्जाचं काम झालं. मे महिन्यात पाऊस पडला आणि तरीही कंत्राटदाराला पटापट काम करा असे सांगण्यात आलेले आहे, असे मनसे नेते यशंवत किल्लेदार यांनी सांगितले.


या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस आणि महापालिका कर्मचारी दाखल झाले. मात्र, स्थानिकांनी त्यांच्यावरही हलगर्जीपणाचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील