Bachchu Kadu यांना बँकेच्या संचालकपदावरून का हटवले? जाणून घ्या सविस्तर

उपोषण संपवल्यानंतर बच्चू कडू यांना सहनिबंधकांकडून धक्का 


अमरावती: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या आठवड्यात बेमुदत उपोषण सुरू केले होते.  सात दिवसांनंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केले, प्रकृती खालवल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या संदर्भात वेगळीच बातमी समोर आली आहे. ती बातमी म्हणजे, बच्चू कडू यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून काढण्यात आले आहे. त्यांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. एका प्रकरणात न्यायालयाने सुनावलेल्या एक वर्षाच्या शिक्षेचा आधार घेत हा निर्णय सहनिबंधकांनी दिला आहे. मात्र यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापण्याची चिन्हे अधिक आहेत.


2017 रोजी नाशिक मध्ये सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत माजी आमदार बच्चू कडू यांना नाशिकच्या विशेष न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या नियमानुसार जर संचालकाला एक वर्षाची शिक्षा सुनावली गेली असेल, तर तो व्यक्ती संचालक पदी कायम राहण्यास अपात्र ठरतो. या नियमाचा आधार घेत जिल्हा सहकारी बँकेच्या विरोधी गटातील बारा संचालकांनी बच्चू कडू यांच्या विरोधात विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार दाखल केली होती.


दरम्यान, हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होते. त्यावेळी बच्चू कडू यांना दिलासा देखील देण्यात आला होता. आता पुन्हा विभागीय सहनिबंधकांनी न्यायालयाच्या शिक्षेचा आधार घेत बच्चू कडू यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर कायम राहण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे सरकारकडून बच्चू कडू यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.



संचालक पदावरून काढल्याबद्दल बच्चू कडू यांची प्रतिक्रिया


बच्चू कडू म्हणाले, आपल्याला जिल्हा बँकेच्या संचालक पदावरून अपात्र ठरविण्यात आले, हे आपल्याला सर्वप्रथम माध्यमांकडूनच कळले. मला अपात्र ठरवले जाते आणि त्याची साधी नोटीसही आपल्याला दिली जात नाही, याचे आश्चर्य वाटते. आपल्यावरील ही कारवाई सूडबुद्धीतून करण्यात आली आहे.



राजकीय संबंध नाही- भाजप आमदार प्रवीण तायडे


बच्चू कडू यांना जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून अपात्र ठरविण्याचा निर्णय हा जिल्हा विभागीय सहनिबंधकांनी घेतळेला आहे. त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. काँग्रेसच्या संचालकांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. हे जुने प्रकरण आहे. त्याचा बच्चू कडू यांनी केलेल्या उपोषणाशीही संबंध नाही, असे अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग