तालुक्यात विद्यार्थ्यांना गळक्या शाळेत गिरवावे लागणार धडे

मोखाडा : तालुक्यात ७ मे रोजी झालेल्या अवकाळी वादळीवाऱ्यासह पावसाने शासकीय मालमत्ता असलेल्या जिल्हा परिषद शाळांची प्रचंड वाताहत केलेली असून जवळपास सहा शाळांवरील पत्र्याचे छप्पर, वाऱ्याच्या वेगाने वीट बांधकाम तुटून पत्रे उडून गेले होते. या घटनेला एक महिना पूर्ण झालेला असून सोमवारपासून शाळांची घंटा वाजणार आहे. तरी देखील त्या शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मुहूर्त मिळाला नसून विद्यार्थ्यांना गळक्या शाळेत बसून धडे गिरवण्याची वेळ आलेली आहे.



मागील मे महिन्यात तालुकाभरात झालेल्या जोरदार वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने ठाकुरवाडी, धामणशेत, कुर्लोद, घोसाळी, करोळ, पाचघर येथील जिल्हा परिषद शाळांची वाताहत झालेली असून वाऱ्याच्या वेगाने विट बांधकाम तुटून पत्रे उडून गेलेले आहेत. सुदैवाने अवकाळी पाऊस येण्याची वेळ ही शाळांना उन्हाळ्यातील सुट्टी लागण्याची असल्याने जीवितहानी टळली होती; परंतु सोमवारपासून शाळांची पुन्हा घंटा वाजणार असल्याने विद्यार्थ्यांची मात्र वर्गात बसायची अडचण होणार आहे. तर जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या छताची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतवर सोपवली असल्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे घोसाळी येथील जिल्हा परिषदेची शाळा ही नगरपंचायत हद्दीत येत असल्याने या शाळेच्या दुरुस्तीकरिता नगरपंचायत प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागणार आहे. अन्यथा घोसाळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गळक्या वर्ग खोलीत बसून धडे गिरवावे लागणार आहेत.


यामुळे अनावश्यक ठिकाणी संरक्षण भिंत बांधकाम, गटारी बांधकाम अशी एकनानेक कामे तत्काळ मंजूर करुन लाखो रुपये खर्च केले जातात मात्र देशाची भावी पिढी घडविण्याचे काम ज्या ज्ञान मंदिरामधून केले जाते अशा शाळांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पैसे नाहीत हे मात्र अनाकलनीय आहे.




  • सोमवारपासून वाजणार शाळांची घंटा.

  • शाळांवरील पत्र्याच्या छप्पराची दुरवस्था.

  • दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाला मुहूर्त मिळेना



मागील महिन्यात अवकाळी वादळी पावसाने नुकसान झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या तात्पुरत्या दुरुस्ती करण्याची सूचना ग्रामपंचायतीना केलेली आहे. तर दोन वर्ग खोल्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्ग खोलीत बसविण्याच्या सूचना शिक्षकांना केल्या आहेत.
- वसंत महाले, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मोखाडा


Comments
Add Comment

एकाच वेळी संसदेत मांडली तीन विधेयक

खासदार डॉ. हेमंत सवरा यांना यश पालघर : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी निगडित तीन महत्त्वपूर्ण विधयके

न्याय मागणाऱ्या महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार

आरोपी हवालदारास अटक डहाणू : आपल्या पतीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेशी जवळीक साधून तिच्यावर

नगर परिषदेच्या निकालापूर्वीच महापालिकेसाठी मनोमिलन

वसई-विरारमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेत गणेश पाटील विरार : पालघर जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद

ग्रामीण भागातही ३० हजार दुबार मतदार

जिल्हा परिषदेच्या ५७ गटातील मतदारांचा समावेश पालघर : मतदार याद्यांमधील दुबार नावावरून सर्वत्र राजकीय वातावरण

गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा

वसई - विरारमध्ये ८० हजार दुबार मतदार?

मतदारयादीत सुधारणा करण्याची बविआची मागणी वसई : वसई - विरार महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये