नालेसफाई असमाधानकारक आढळून आल्याने, स्वच्छता अधिकारी निलंबित

कल्याण : कल्याण, डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी नुकतेच कल्याण पूर्वेतील जे आणि ड प्रभाग क्षेत्रातील नाले साफसफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली. जे प्रभागात आयुक्तांनी लोकग्राम व मंगलराघोनगर या परिसरातील मध्यम नाल्यांची साफसफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली असता या नाल्यांची ६५-७० टक्के साफ-सफाई झाल्याची माहिती प्रभागाचे सहा.आयुक्त सचिन तामखेडे यांनी दिली. पुढील ८ दिवसात प्रभागातील सर्व नाल्यांची साफ-सफाई पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नाल्यातून काढलेला गाळ त्वरीत उचलण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


तर ड प्रभागात आयुक्तांनी विजयनगर नाका व तिसगाव पाडा या परिसरात प्रत्यक्ष भेट देवून नाले साफ-सफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली. या पाहणी दरम्यान काही ठिकाणी नाले सफाईचे काम असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, या प्रभागातील स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे यांस निलंबित करण्यात आले आहे.


नाले सफाई पाहणी पूर्वी महापालिका आयुक्त अभिनव आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जे आणि ड प्रभागातील आपत्कालीन परिस्थितीतील पूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेणेकामी, बैठक संपन्न झाली. या बैठकीत धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संख्या, त्या इमारतीतून रहिवास मुक्त केलेल्या कुंटूबांची संख्या तसेच अनधिकृत होर्डिग्ज विरोधातील कारवाई याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Comments
Add Comment

Thane : राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

ठाणे : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Thane News : कासारवडवलीतील ७८० मीटर डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा होणार; अण्णा बनसोडेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

ठाणे : ठाण्यातील कासारवडवली-मोगरपाडा परिसरातील ७८० मीटर लांबीच्या डीपी रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी चर्चा

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक

Eknath Shinde : गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवा! मनपांना उपमुख्यमंत्र्यांचे आदेश; उत्कृष्ट काम करणाऱ्या पालिकेला बक्षीस

खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांना कामाला लागण्याचे निर्देश पावसाळ्यात तातडीने

Mira Road : स्कूल व्हॅन रस्त्यावरून जात असताना मेट्रोचा स्लॅब कोसळला, आणि...

मिरा रोड : मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मेट्रोशी संबंधित कामं प्रगतीपथावर आहेत. मेट्रोच्या कामांमुळे काही

Dombivli Local Train Accident : डोंबिवली लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू; पोस्टमार्टेम रिपोर्टने तपासाला नवे वळण

डोंबिवली : डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर