नालेसफाई असमाधानकारक आढळून आल्याने, स्वच्छता अधिकारी निलंबित

कल्याण : कल्याण, डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी नुकतेच कल्याण पूर्वेतील जे आणि ड प्रभाग क्षेत्रातील नाले साफसफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली. जे प्रभागात आयुक्तांनी लोकग्राम व मंगलराघोनगर या परिसरातील मध्यम नाल्यांची साफसफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली असता या नाल्यांची ६५-७० टक्के साफ-सफाई झाल्याची माहिती प्रभागाचे सहा.आयुक्त सचिन तामखेडे यांनी दिली. पुढील ८ दिवसात प्रभागातील सर्व नाल्यांची साफ-सफाई पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नाल्यातून काढलेला गाळ त्वरीत उचलण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


तर ड प्रभागात आयुक्तांनी विजयनगर नाका व तिसगाव पाडा या परिसरात प्रत्यक्ष भेट देवून नाले साफ-सफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली. या पाहणी दरम्यान काही ठिकाणी नाले सफाईचे काम असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, या प्रभागातील स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे यांस निलंबित करण्यात आले आहे.


नाले सफाई पाहणी पूर्वी महापालिका आयुक्त अभिनव आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जे आणि ड प्रभागातील आपत्कालीन परिस्थितीतील पूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेणेकामी, बैठक संपन्न झाली. या बैठकीत धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संख्या, त्या इमारतीतून रहिवास मुक्त केलेल्या कुंटूबांची संख्या तसेच अनधिकृत होर्डिग्ज विरोधातील कारवाई याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे