अंबरनाथकरांना मेट्रोचे गिफ्ट!

एमएमआरडीएला विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना


अंबरनाथ : अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर परिसरातील नागरिकांना नव्या मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ प्रकल्प विस्तार करून आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गाने थेट अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत पोहचणार आहे. यामुळे या भागातील रहिवाशांना थेट आणि जलद मेट्रो सेवा मिळणार असून चिखलोली हे स्थानक एक प्रमुख ट्रान्सपोर्ट हब म्हणून उदयास येणार आहे. बदलापूर - कांजूरमार्ग मेट्रो १४ च्या माध्यमातून अंबरनाथ,बदलापूर आणि आसपासच्या नागरिकांना थेट मुंबई गाठता येणार आहे. तर मेट्रो ५च्या या विस्तारामुळे नागरिकांना ठाणे गाठणे सोपे होणार आहे.


विशेष म्हणजे, चिखलोली रेल्वे स्थानकाच्या येथे रेल्वे आणि मेट्रोचे एकत्रीकरण होणार असल्यामुळे प्रवास सुलभ व सुसंगत होईल. यासाठी स्थानकाची तशा पद्धतीने उभारणी करण्यात येणार असून याबाबतचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएला दिल्या आहेत. एमएमआरडीएच्या मुख्यालयात याबाबत शुक्रवारी बैठक पार पडली. यावेळी बैठकीला आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रवी पाटील, राजेश कदम यांच्यासह एमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही या प्रकल्पासाठी मागणी केली होती.


कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मतदारसंघात वाहतुकीला नवा आयाम देणारे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल यांची सुसज्जता ठेवण्यास खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे विशेष प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर मेट्रो ५ आणि मेट्रो १४ या प्रकल्पांच्या विस्तारित टप्प्यांमुळे कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि बदलापूर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि लोकल गाड्यांवरील ताण कमी होईल. या दोन्ही मार्गांचे विस्तारीकरण झाल्याने कांजुरमार्ग मेट्रोचा प्रवासी उल्हासनगर, भिवंडीमार्गे ठाण्याला जाऊ शकेल. तर उल्हासनगरच्या प्रवाशाला चिखलोली स्थानकातून मुंबईला जाता येणार आहे.


शिवाय, पर्यावरणपूरक मेट्रोमुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळेल. या प्रकल्पांमुळे स्थानक परिसरात वाणिज्य, सेवा उद्योग आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल. या मेट्रो प्रकल्पांचा उद्देश केवळ वाहतूक सुधारणा नसून, एकत्रित नागरी विकास साधणे हा आहे. सध्या या मेट्रो प्रकल्पाचे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून, लवकरच यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. हा मेट्रो प्रकल्प म्हणजे कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि चिखलोली या भागांच्या विकासाचा रोडमॅप ठरणार असून, 'एक शहर एक मेट्रो नेटवर्क' या संकल्पनेची सुरुवात यामुळे प्रत्यक्षात येणार आहे.


चिखलोली ठरणार ट्रान्सपोर्ट हब


मेट्रो ५ चा विस्तार चिखली रेल्वे स्थानकापर्यंत केल्याने नागरिकांना एकाच ठिकाणाहून मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे लवकरच चिखलोली रेल्वे स्थानक हे महत्वाचे ट्रान्सपोर्ट हब होणार आहे.


“बदलापूर आणि अंबरनाथमधून मुंबई आणि ठाणे येथे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामुळे स्थानकांवर प्रचंड गर्दी होत आहे. चिखलोली रेल्वे स्थानक आणि मेट्रो सेवेमुळे हा ताण कमी होईल. यामुळे प्रवास सुलभ आणि जलद होईल,” असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे

अरे बापरे! तब्बल १२ हजार कोटींची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त! मीरा-भाईंदर पोलिसांची कमाल!

मीरा-भाईंदर: मीरा रोडमधील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना