मोहन्यातील लहुजी नगरात हागणदार मुक्तीला हरताळ

उघड्यावर शौचाला जाण्याची वेळ


कल्याण : कल्याण, डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याचा गवागवा केला जात असला तरी मोहने येथील लहुजी नगर झोपडपट्टी वासियांना शौचालय सुविधा अभावी उघड्यावर प्रातर्विधी उरकावा लागत असल्याने शासनाच्या हागणदारी मुक्त अभियनाला मनपा क्षेत्रात हरताळ बसल्याचे दिसते.


मोहने येथील लहुजी नगर झोपडपट्टी वजा वसाहतीमध्ये दोन हजारहून अधिक नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उघड्यावर शौच करावयास जावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि घर शौचालय योजनेचा गाजावाजा करणाऱ्या सरकारच्या दाव्यांना लहुजी नगरमधील वस्तुस्थितीने चपराक दिली आहे. कडोंमपाच्या हद्दीत मोहन्यातील लहुजीनगर मधील तब्बल २,५०० नागरिकांचा संभाव्य आरोग्याचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.


स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही कल्याण डोंबिवली सारख्या स्मार्ट शहरात उघड्यावर शौचाला जाण्यास नागरिक मजबूर आहेत. विशेषतः महिला वर्गाची यामुळे होणारी कुचंबणा आणि मानसिक त्रास ही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब ठरत आहे. लहुजी नगर मधील पूर्वीच्या जुन्या शौचालयाची पडझड झाल्याने ते तोडण्यात आले. त्या जागी नवीन शौचालय बांधणे गरजेचे होते. परंतु शौचलय बांधण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, यापूर्वी सुलभ शौचालय दुमजली बांधण्याचे काम इमारत बांधून देखील न्यायालयीन वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने अद्याप देखील सुरू होऊ शकले नाही.


लहुजी नगर मधील करदाते नागरिक मनपाला मालमत्ता कर भरतात, त्यांच्या मुलभूत सुविधा पुरविणे मनपाचे काम आहे. कोणच्या दबावामुळे नागरी सोयी सुविधाचा बोजावारा होत आहे, असाही आरोप यानिमित्ताने होत आहे. याबाबत माजी नगरसेवक दया शेट्टी यांनी खासदार सुरेश बाळ मामा म्हात्रे यांची भेट घेतली असून लहुजी नगरच्या शौचालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी विनंती केली आहे. नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नसणे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे असे दया शेट्टी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे

अरे बापरे! तब्बल १२ हजार कोटींची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त! मीरा-भाईंदर पोलिसांची कमाल!

मीरा-भाईंदर: मीरा रोडमधील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना