एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती

मुंबई :परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन महामंडळ धर्तीवर एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक नुकतेच एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर यांनी काढले असून पुढील काही दिवसात हे प्रादेशिक विभाग स्वतंत्रपणे आपले कार्यालय सुरू करित आहेत.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे एसटी महामंडळाच्या नियोजन व पणन खाते अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संनियंत्रण समित्यांचे कार्यालय दिनांक ०६/१२/२०१६ पासून बंद करण्यात आले होते. परंतु परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक हे कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील महामंडळाच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना उचलून धरली. त्यामुळे आकार व प्रशासकीय दृष्ट्या कर्नाटक महामंडळाच्या दुप्पट असणाऱ्या महाराष्ट्र एसटी महामंडळाचे देखील किमान ५ प्रादेशिक विभागात विभाजन करावे अशी संकल्पना त्यांनी मांडली.


नियंत्रण, नियोजन आणि समन्वयासाठी ५ प्रादेशिक विभागांची रचना


राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या धर्तीवर एसटीची यंत्रणा उभी आहे. तालुकास्तरावर आगार जिल्हास्तरावर विभागीय कार्यालय आणि राज्य स्तरावर मध्यवर्ती कार्यालय अशी त्रिस्तरीय रचना सध्या कार्यरत आहे. परंतु राज्य शासनाच्या महसूल विभागा प्रमाणे सहा प्रशासकीय विभागांचा या त्रिस्तरीय रचनेत समावेश नव्हता. त्यामुळे मध्यवर्ती कार्यातून थेट विभागीय कार्यालयाशी संवाद साधणे भौगोलिक दृष्ट्या शक्य होत नव्हते. अर्थात, स्थानिक पातळीवर वाहतुकीचे नियोजन करणे, यात्रा- जत्रा यासाठी जादा वाहतूक करणे असे निर्णय घेण्यासाठी विलंब होत असे, अथवा प्रशासकीय दिरंगाई मुळे त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या महसूलावर होत होता. या सर्वांची दखल घेऊन " नियंत्रण नियोजन आणि समन्वयाच्या " हेतूने महामंळातंर्गत ५ प्रादेशिक विभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

खोल समुद्रातील मासेमारीसाठी १४ सहकारी संस्थांना अद्ययावत समुद्री नौका

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर