पदपथावरील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करणे अपेक्षित

कांदिवली : मालाड पश्चिमेला जन कल्याण नगर मुख्य मार्गांवरील पद पथावर अनधिकृत व्यवसायिकांनी बस्तान मांडले आहे. जनकल्याण नगरात असलेल्या नागरिकांसाठी जन कल्याण नगर मार्ग हा सर्वाधिक वापरात असलेला मुख्य अरुंद मार्ग आहे. यां मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. यां मार्गाच्या पदपथावर अनधिकृत व्यावसायिक,भाज्या, फळे व इतर वस्तूंची विक्री करत आहेत. यामुळे प्रवाशांसह नागरिकांना वाहतुकीच्या मार्गांवरूनच तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. पालिकेने अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करून पद पथ मोकळा करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.


जन कल्याण नगरात उच्चंभ्रू वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिकांचा दैनंदिन व्यवहार जन कल्याण नगर मार्गांवर केला जातो. सदर मार्ग चारकोप ते मालाड मालवणी रस्त्याला जोडला गेल्याने यां मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मार्गाच्या पद पथा वर अनधिकृत व्यवसायिकांनी बस्तान मांडून, पद पथ गिळकृत केला आहे. तसेचं खरेदी करणारे नागरिक आपली वाहने, दुचाकी अनधिकृत विक्रेत्या समोरच उभी करत असल्याने, मार्ग अधिकच अरुंद होतो. यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.


प्रवाशांना आणि स्थानिकांना पद पथ सोडून,वाहतुकीच्या रस्त्यावरूनच तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागते, यामुळे लहान मोठे वाद, अपघात होतात. पालिकेने पद पथा वरील अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करून पद पथ मोकळा करावा जेणेकरून महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होईल, अशी मागणी स्थानिकांमध्ये केली जात आहे.

Comments
Add Comment

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार

मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ

ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी होणार अनावरण महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी

मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा!

मुंबई : कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने

‘मराठी भाषा’ ही नदीप्रमाणे सतत वाहणारी परंपरा

मुंबई : मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून हजारो वर्षांची नदीसारखी अविरतपणे वाहणारी सांस्कृतिक परंपरा आहे,

मुंबईत दिंडोशी मनपा वसाहतीत दूषित आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा

​मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 'पी पूर्व' (P-East) विभागांतर्गत येणाऱ्या गोरेगाव (पूर्व) येथील दिंडोशी मनपा वसाहत

प्रजासत्ताक दिनाला जोडून सुट्ट्यांमुळे महाराष्ट्र, गोव्यातील बस आरक्षणात वाढ

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या लाँग विकेंडमुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील आंतरशहरी बस प्रवासात लक्षणीय वाढ होत