शाळा नव्याने सुरू होताना...

डाॅ. स्वाती गानू


लवकरच शाळा सुरू होतील. मुलांना नवे वर्ग, नव्या मित्रमैत्रिणी, नवीन शिक्षक यांच्याबरोबर नवीन वर्ष सुरू करायचे आहे. या सुरुवातीच्या काळात नवीन वह्या, पुस्तकं, बसण्याची नवी जागा यांच्याबद्दल बहुतेक सगळ्या मुलांच्या मनात उत्सुकता असते, कुतूहल असते. नवीन ॲडमिशन झालेल्या मुलांशी मैत्री व्हावी, त्याला आपल्या शेजारी बसायला जागा द्यावी, असा विचार करणारी काही मुलं असतात. मात्र काहीजण नवीन मुलांना, जुन्या विद्यार्थ्यांना त्रास देण्यात मजा वाटून घेणारीही असतात. म्हणूनच पालकांनो, मुलांना काही गोष्टींबद्दल सहज गप्पा मारता मारता काही जाणिवा द्यायला हव्यात.
जसं नकारात्मक विचार करणाऱ्या मुलांमुळे, लोकांमुळे तुझं मन दुखावतं. तसं तुझ्याबरोबरच्या मित्रांना जर असं कोणी वागवत असेल तर त्यांच्या मनाला आतून काय वाटत असेल? त्यांच्या मनाचं दुःख तू कसं टाळू शकशील हे मुलांना समजावून सांगा. जसे की,


१. एकमेकांविषयी किंवा एकमेकांबद्दल गॉसिप करणं, त्या मुलांच्या मागे वाईट बोलणं हे टाळायलाच हवं. बोलताना बाऊन्ड्रीज, मर्यादा आखून घ्यायलाच हव्यात.


२. अशी मुलं तुमच्यावर प्रभाव, इन्फ्लुअन्स टाकणारे आम्हीच ग्रेट आहोत असं समजतात. त्यांना प्रत्येक गोष्टीविषयी स्वतःचं असं मत सांगायचं असतं. स्वतःचं महत्त्व वाढवायचं असतं. ते बहुतेकवेळा तुझ्या मित्रांच्या लो सेल्फ एस्टीमवर कमेंटस् करतात. मात्र तू त्यांची अडचण समजून घे आणि त्या मुलांशी मायेने वाग.


३. जर तुझे मित्र दुसऱ्यांना खूश करण्यासाठी सतत स्वतःचे मन दुखावलं तरी सहन करत असतील तर या मुलांना मदत कर. ही मुलं खूप चांगले मित्र असतात. ते मदत करणारे असतात. पण त्यांच्या या स्वभावाचा लोक गैरफायदा घेतात. स्वतःसाठी स्टॅन्ड घेणं त्यांना खूप कठीण जातं. आपलं मत मांडणं, आवाज उठवणं त्यांना जमत नाही. त्यांना वाटतं की, त्यांच्या या वागण्याने संघर्ष, भांडणं होतील. ही भीती सारखी त्यांच्या मनात असते. त्या मुलांना विचारा की तुम्ही एकटे असताना काय वाटतं तुला? काय विचार येतात मनात? अशा मुलांना मदत केलीस तर त्यांच्या मनावरचं ओझं जरा कमी होईल.


४. आजकाल शाळेत मुलांना, मोठी मुलं, वर्गातील काही मुलं बुली करतात. काही मुलांचे इंटरनेट, सोशल मीडियाद्वारेही रॅगिंग केलं जातं. जी मुलं मनाने कमजोर असतात त्यांनाच टारगेट केलं जातं. हे सगळं तू पाहत असतोस. पण ज्या मुलांना बुली केलं जातं त्यांना सांग, शिकवं की प्रत्येकाला आपण आवडूच असं नाही. इटस् ओ. के., तू कॉन्फिडन्ट राहा. तू जर हिंमत दाखवलीस तर त्या बुली करणाऱ्या मुलांची पॉवर कमी होईल. शक्य होईल तेवढं त्यांना टाळ. जर ते त्या मुलाला त्रास देत असतील, दुखापत करत असतील तर मात्र मोठ्या माणसांची मदत घे.


५. तुझ्याबरोबर अशी काही मुलं असतात ज्यांना नेहमी असं वाटत असतं की’ I need to be center of attention’ ही मुलं तू बोलत असताना सतत चुळबुळ करून, सारखं मध्ये मध्ये बोलून तुला डिस्टर्ब करतील. ते वाईट नसतात पण ते सेल्फ फोकस्ड असतात किंवा ते त्यांच्या मनातील शेअर करण्यास खूप उत्सुक असतात. त्यांच्याबरोबर बोलणं हे खरोखरच खूप निराशा देणारं असतं.


६. The one upper मुलांना संपूर्ण जगाने त्यांच्याभोवती फिरत राहावं असं वाटतं असतं. ‘या मुलांना त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा फार कोणाकडून प्रेम मिळत नाही. त्यांचं हे वागणं तू पर्सनली घेऊ नकोस, त्यांना लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. ते खूप लक्षपूर्वक ऐकतील, प्रॉब्लेम असताना मदत करतील अशी अपेक्षा करू नकोस. त्यांच्याशी दयाळूपणे वाग. पण महत्त्वाच्या गोष्टींबाबत मात्र इतर मुलांशी चर्चा कर.


७. काही मुलं तुला अशीही भेटतील जी तुझ्या आनंदाने खूश होतील. तुझ्या आनंदात सहभागी होतील. ते तुझ्याशी स्वतःची तुलना करणार नाहीत किंवा ते तुझ्याशी स्पर्धा करणार नाहीत. अशा मुलांवर प्रेम कर. महत्त्वाच्या गोष्टी या मुलांशी शेअर करायला हरकत नाही कारण ते तुझे well wishers आहेत. या जगात खरंच खूप चांगली मुलं असतात. ते तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि तुला सपोर्ट करतील. तुझं यश कधीही तुझ्याकडून हिरावून घेणार नाहीत. ते तुझ्या प्रगतीसाठी खरोखरंच मनापासून काळजी घेतील. त्यांना तुमच्या दोघांच्या नात्याचं मोल कळतं आणि तुला यशस्वी झालेलं पाहिलं की ते खूश होतात, असे मित्र निवड आणि त्यांच्याशी जवळीक वाढव.


८. तू यशस्वी झालास की, जे आनंदित होतात अशा मित्रांबरोबर यश साजरं कर, जे मनापासून तुझं बोलणं ऐकू इच्छितात त्यांच्याशी मनातील गोष्टींची चर्चा कर, अगदी अपयशाचीही चर्चा कर. कारण तुला जे सांगायचंय ते ऐकण्यात त्यांना रस आहे. अशा मित्रांना चांगल्या-वाईट दोन्ही परिस्थितीत सपोर्ट कर.
पालकांनो, मुलांना जेव्हा या गोष्टींची आपण जाणीव करून देतो की, या जगात किती विविध प्रकारचे मित्र, माणसं असतात. त्यांच्याशी जुळवून घेणं किंवा अंतर राखून वागणं, त्यांना मदत करणं, वाचवणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांना संधी देणं, त्यांची सेल्फ एस्टीम वाढवण्यात मदत करणं, एम्पॅथॅटिक राहणं हे सारं मुलांना माहीत करून द्या म्हणजे जिथे रेड सिग्नल मिळेल त्या मित्रांबाबत मुलं सावध होतील आणि निरोगी व परिपूर्ण मैत्रीच्या नात्यासाठी त्यांच्या मनात जागा तयार होईल.

Comments
Add Comment

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला खोल जखम

नोंद-भागा वारखडे देशात दर वर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतात. हे स्वप्न केवळ करिअरचे नसते, तर

मुमुक्षु : पटलावरचा प्रवास

इतिहासाच्या पाऊलखुणांनी आणि पराक्रमाच्या गाथांनी पावन झालेल्या या भूमीचा वारसदार असणं, यासारखं थोर भाग्य नाही.

मौनम् सर्वार्थ साधनम् ।

संवाद-गुरुनाथ तेंडुलकर ही कथा आहे १७व्या दशकातील... त्यावेळी रशियामध्ये झार निकोलस नावाचा राजा राज्य करीत होता.

नरक आणि नरक यातना

महाभारतातील मोतीकण -  भालचंद्र ठाकूर पृथ्वीवरील जीव अनेक प्रकारची कर्मे करतो. कर्माचेही सात्त्विक राजस व तामस

‘कोकणात आहे माहेर माझं...’

नॉस्टॅल्जिया -श्रीनिवास बेलसरे काळ होता ६०च्या दशकातला म्हणजे आजपासून सुमारे ६५ वर्षांपूर्वीचा! भौतिक प्रगती

अधिक मास : आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पर्व

स्मृतीगंध-लता गुठे आजही ग्रामीण भागामध्ये ‘अधिक मासा’ला विशेष महत्त्व दिले जाते. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण,