Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताचे तुर्की कनेक्शन? जाणून घ्या सत्य

  188

अपघातग्रस्त विमान टर्किश टेक्निकने देखभाल केला असल्याचा दावा खोटा


नवी दिल्ली: अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताशी तुर्कस्तानसोबत संबंध असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. अपघातग्रस्त विमानाची देखभाल टर्किश टेक्निकअंतर्गत झाली असल्याचा दावा योग गुरु रामदेव बाबा यांनी आरोप केला आहे. मुळात हा दावा किती खरा आहे, आणि एअर इंडिया आणि टर्किश टेक्निक यामध्ये कोणता करार झाला होता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


एअर इंडिया विमान अपघातानंतर, तुर्की अधिकाऱ्यांनी तुर्की टेक्निकच्या देखभालीच्या दाव्याचे खंडन केले. त्यांनी स्पष्ट केले की एअर इंडियासोबतच्या त्यांच्या करारांमध्ये फक्त B777 विमानांचा समावेश होता.



अधिकाऱ्यांकडून दाव्याचे खंडन


अपघातग्रस्त एअर इंडिया बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरच्या देखभालीशी तुर्की कंपनीचे नाव जोडले जात होते, परंतु आता तुर्कीने हे दावे नाकारले आहेत. सेंटर फॉर काउंटरिंग डिसइन्फॉर्मेशन ऑफ द कम्युनिकेशन डायरेक्टरेटने एका निवेदनात स्पष्ट केले की तुर्की टेक्निकने विमानाची देखभाल केल्याचा दावा खोटा आहे. विभागाने म्हटले आहे की, 'अपघातग्रस्त एअर इंडिया प्रवासी विमान 'बोईंग ७८७-८' तुर्की टेक्निकने देखभाल केल्याचा दावा पूर्णपणे खोटा असून, तुर्की आणि भारत संबंधांबद्दल जनमत प्रभावित करण्याच्या उद्देशाने ही चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे."


भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कीशी संबंध बिघडले आहेत. तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला, भारताविरुद्ध वापरलेली बहुतेक पाकिस्तानी शस्त्रे देखील तुर्कीमध्ये तयार केली जात होती. यानंतर, भारतात तुर्की वस्तूंवर बहिष्कार घालण्यास सुरुवात झाली आणि सरकारने काही कंपन्यांवर कठोर कारवाई देखील केली आहे. अशा परिस्थितीत, तुर्की पाकिस्तानवरील प्रेमाची किंमत चुकवत आहे आणि त्यांच्या कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरशी तुर्कीचा कोणताही करार नाही 


'२०२४ आणि २०२५ मध्ये एअर इंडिया आणि टर्किश टेक्निक यांच्यात झालेल्या करारानुसार, केवळ बी७७७ प्रकारच्या वाइड-बॉडी विमानांसाठी देखभाल सेवा प्रदान केल्या जातात. अपघातात सहभागी असलेले बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर या कराराच्या कक्षेत येत नाही. आजपर्यंत, टर्किश टेक्निकने अशा कोणत्याही एअर इंडिया विमानाची देखभाल केलेली नाही.'  



मृतदेहांची ओळख पटवणे कठीण


१२ जून रोजी गुरुवारी दुपारी अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेऊन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय १७१ हे प्रवासी विमान काही मिनिटांतच खाली कोसळले.  जमिनीवर पडण्यापूर्वी, विमान विमानतळालगतच्या मेघानी नगर येथील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर आदळले. या अपघातात विमानातील प्रवाशांव्यतिरिक्त वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टरांनाही आपला जीव गमवावा लागला. एअर इंडियाच्या या विमानात २४२ लोक होते, ज्यात २३० प्रवासी, दोन पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते. यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हे एकमेव व्यक्ती या अपघातात बचावले. विमानातील आग आणि उच्च तापमानामुळे बहुतेक मृतदेह गंभीरपणे जळाले आहेत, ज्यांची ओळख पटवणे कठीण आहे. त्यामुळे डीएनए मॅचिंगद्वारे पीडितांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ओळख पटल्यानंतर मृतदेह कुटुंबियांना सोपवले जात आहेत.



गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली


डीएनए मॅचिंगद्वारे आतापर्यंत ३३ मृतदेहांची ओळख पटली आहे, ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृतदेह देखील समाविष्ट आहे. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार केले जातील. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने घटनेच्या २८ तासांनंतर ब्लॅक बॉक्स शोधला आहे आणि या मोठ्या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या

एलन मस्कच्या ‘स्टारलिंक’ला भारतात परवाना

आता प्रत्येक गावात पोहोचणार थेट इंटरनेट नवी दिल्ली : अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक

इंडिगो फ्लाइटमध्ये हाणामारी! एकाने दुसऱ्याच्या दिली कानशिलात, पुढे काय झाले? पहा व्हिडिओ

कोलकाता: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एअर होस्टेस एका प्रवाशाला मदत करताना दिसून येत आहे.