Yellow Fertility & IVF Centre: यलो फर्टिलिटी अँड आयव्हीएफची विस्तार योजना

२०३० सालापर्यंत भारतातील मोठे आयव्हीएफ नेटवर्क बनण्‍याचा संकल्‍प

मुंबई: यलो फर्टिलिटी अँड आयव्हीएफ या भारतातील परवडण्याजोग्या आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या फर्टिलिटी केअर कंपनीने २०३० सालापर्यंत आपले फूटप्रिंट १०० केंद्रांपर्यंत नेण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. हा उपक्रम भारतातील एक मोठे व सर्वांत विश्वासार्ह आयव्हीएफ नेटवर्क होण्याच्या ब्रॅण्डच्या मिशनचा भाग आहे, तसेच भारतातील व जगभरातील अपत्यप्राप्तीची इच्छा असलेल्या व्यक्तींना उच्च दर्जाची व परवडण्याजोग्या दरांतील वंध्यत्व निवा रण सेवा उपलब्ध करून देत आहे. यलो फर्टिलिटीचे विस्तार धोरण बाजारपेठेच्या सखोल अभ्यासाच्या बळावर निश्चित करण्यात आले आहे. उच्चसंभाव्यता स्थळे निश्चित करून हे धोरण आखले गेले आहे. यांसाठी वंध्यत्व दर,सामाजिक घटक, प्रतिस्पर्धी ब्रॅण्डचे अस्तित्व, यशस्वी निष्पत्ती आणि प्रादेशिक दररचना यांसारख्या घटकांचा आधार घेण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

आघाडीच्या आयव्हीएफ तज्ज्ञांना आकर्षित करून घेणारे आणि त्याचबरोबर नवोन्मष्कारी, यशावर आधारित दररचनेचा लाभ घेऊन रुग्णांसाठी उपचार परवडण्याजोगे करणारे व्यापक व्यवसाय प्रारूप उभे करण्यावर यात भर दिला गेला आहे. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या प्रदेशांना लक्ष्य करून, प्रथमच सेवा देणाऱ्या ब्रॅण्डला मिळणारा लाभ घेण्याचे व कार्यक्षेत्र विस्तारण्याचे लक्ष्य यलो फर्टिलिटीने ठेवले आहे. यलो फर्टिलिटी अँड आयव्हीएफच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी अंबिका भाईक म्हणाल्या, 'आम्ही केवळ आमच्या केंद्रांचा विस्तार करत नाही आहोत, तर वंध्यत्व निवारणाच्या उपचारांची उपलब्धता वाढवून कोट्यवधी जोडप्यांना आशेचा किरण दाखवत आहोत. अपत्यप्राप्तीसाठी दर्जेदार उपचार मिळणे हा विशेषाधिकार नव्हे, तर मुलभूत अधिकार आहे, या एकमेव विचारातून आमची विस्तार योजना उदयाला आली आहे.आमचा रुग्णकेंद्री दृष्टीकोन, परवडण्याजोग्या दरातील उपचार आणि किफायतशीरपणा हा आमच्या कामाचा गाभा आहे. या विस्तार योजनेच्या माध्यमातून आमचे हे काम आजवर दुर्लक्षित राहिलेल्या प्रदेशांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा उद्देश आहे.'

डिसेंबर २०२३ मध्ये स्थापन झालेले यलो फर्टिलिटी सध्या अनेकविध केंद्रे चालवत आहे, त्यामध्ये गुरगाव-५७ व आता काश्‍मीरमधील त्यांचे फ्लॅगशिप एल२ केंद्र आणि गुरगाव-९० व दादरीमधील एल१ केंद्रांचा समावेश होतो. रुग्णकेंद्री धोरणा च्या आधारे उभारण्यात आलेला हा ब्रॅण्ड परवडण्याजोगे दर, पारदर्शकता व अत्याधुनिक वैद्यकीय कौशल्य यांचा मिलाप साधतो. आयव्हीएफच्या यशस्वीतेचा दर ८६ टक्के एवढा लक्षणीय आहे. सर्वांत छोटे सिंगल-सायकल आयव्हीफ पॅके ज १.४ लाख रुपयांत उपलब्ध आहे, यासाठी केल्या जाणाऱ्या ‘यलो काँट्रॅक्ट’ (Yellow Contract) या अनन्यसाधारण कराराद्वारे यलो फर्टिलिटी भारतातील वंध्यत्व निवारण उपचारांचे स्वरूप बदलत आहे. या करारात १०० टक्के यशाची ग्वाही दिली जाते.  दोन आयव्हीएफ चक्रांनंतरही गर्भधारणा झाली नाही, तर रुग्ण एका विशेष आश्वासन रकमेसह (Assurance Amount) उपचार पुढे चालू ठेवू शकतात, यात तिसऱ्या चक्रापासून पुढे केवळ उपभोग वस्तूंच्या खर्चाचा समा वेश केला जातो. यलो फर्टिलिटी अनेकविध प्रगत वंध्यत्व निवारण उपचार देऊ करते.  यांमध्ये सरोगसी, इन व्हायट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ IVF), इंट्रायुटेराइन इन्सेमिनेश (आययूआय IUI), एग अँड सिमन फ्रीझिंग, ओव्हरियन पीआरपी, जनुकीय चाचण्या आदींचा समावेश होतो. प्रत्येक उपचार पद्धती ही व्यक्तीच्या गरजा व खर्चाची तयारी यांनुसार निश्चित केली जाते असे कंपनीने म्हटले आहे.
Comments
Add Comment

भाजप हीच देशाची पहिली पसंती: पंतप्रधान मोदी

सुशासनासाठी जनतेचा विक्रमी जनादेश! देशाला आता केवळ विकास आणि 'गुड गव्हर्नन्स' हवा दिसपुर (वृत्तसंस्था): आज भाजप

जागतिक बेरोजगारी यंदा ४.९% वर स्थिर राहण्याचा अंदाज

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) ताज्या अहवालानुसार, २०२६मध्ये जागतिक

इराणमधील हिंसक आंदोलनात आतापर्यंत ५ हजार जणांचा मृत्यू

तेहरान(वृत्तसंस्था): इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे आतापर्यंत किमान पाच हजार जणांचा मृत्यू झाला

विराट-अनुष्काची अलिबागमध्ये मोठी गुंतवणूक

अलिबाग (प्रतिनिधी) : मुंबईजवळ असलेल्या अलिबागमध्ये आता ‘सेकंड होम’ आणि लक्झरी व्हिलाचा ट्रेंड वेगाने वाढतोय.

Papa Rao Killed in Encounter : नक्षलवाद्यांचा अजून ईक्का ठार..पोलीसांची मोठी कारवाई.

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे व तेथील नागरिकांना ही दिलासा

जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात सिंगापूर पोलिसांचा मोठा खुलासा; हत्या नसून.......

सिंगापूर : आसाममधील प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयावर सिंगापूर पोलिसांच्या तपास