मुंबई मेट्रो क्रमांक ९ मार्गिकेच्या कामाला वेग

दहिसर ते मीरा-भाईंदर मार्गाचे काम प्रगतिपथावर


मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा असून, सध्या या मार्गाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे.



या अंतर्गत, भाईंदर पश्चिम रस्ता उड्डाण पुलाजवळील (आरओबी) अत्यंत आव्हानात्मक आणि वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आला. हे कार्य मर्यादित रात्रीच्या वेळेत विविध यंत्रणांमधील अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले. ही कामगिरी सुरक्षितता, गुणवत्ता आणि वेळेच्या बंधनात उत्कृष्टतेने पार पाडण्यात एमएमआरडीएचे योगदान अधोरेखित करते.


लांबी – १०.५४ किमी | स्थानके – ८ उन्नत | एकूण प्रगती – ९५% गर्डर माप – ६५ मीटर लांब, ९.५७५ मीटर रुंद, सुमारे ७०० मेट्रिक टन वजनगर्डर रचना – ३ भागांमध्ये (प्रत्येकी सुमारे २३५ मेट्रिक टन वजन, ३ मीटरहून अधिक खोल) कार्यक्षेत्र – भाईंदर पश्चिम, पश्चिम रेल्वे मार्गावर (अतिशय आव्हानात्मक आणि दाट लोकवस्तीचा भाग)


अंमलबजावणी – ७, ८ व ११ जून २०२५ रोजी रात्री १.५ तासांच्या ब्लॉकमध्ये साधने–६०० मेट्रिक टन व ७५० मेट्रिक टन क्षमतेचे क्रेन्स वापरले; ६०० मेट्रिक टनची एक राखीव क्रेन सहकार्य–पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे व वाहतूक पोलीस यांचे मोलाचे सहकार्य


संचालन उद्दिष्ट्ये –
टप्पा १ : दहिसर (पूर्व)–काशिगाव (डिसेंबर २०२५)
टप्पा २ : काशिगाव–नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (डिसेंबर २०२६) अशा महत्त्वपूर्ण टप्प्यांद्वारे एमएमआरडीए मुंबईतील नागरी वाहतूक व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सातत्याने पुढे वाटचाल करत आहे.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी