Livpure Unione Collbration: लिव्हप्युअरची देशभरात १०० हून अधिक स्टोअर्स होणार खुली

  38

कंपनीचा युनिवन समुहासोबत करार 


मुंबई : लिव्‍हप्‍युअर  स्मार्ट आरओ वाँटर प्युरिफायर कंपनी देशभरात १०० हून अधिक स्टोअर्स खुली करणार आहे. कंपनीने यासाठी युनिवन समुहासोबत करार केला आहे. या सहयोगांतर्गत भारतभरात ब्रँडच्‍या रिटेल विस्‍तारीकरणाला गती मिळणार आहे. या करारामुळे दोन्ही कंपन्यांच्या प्रबळ नेटवर्कच्‍या माध्‍यमातून अधिकाधिक ग्राहकांना नाविन्‍यपूर्ण, स्‍वास्‍थ्‍य-केंद्रित उत्‍पादने उपलब्ध होतील.


या सहयोगांतर्गत लिव्‍हप्‍युअर पुढील १८ ते २४ महिन्‍यांमध्‍ये १०० हून अधिक ब्रॅड स्‍टोअर्स दाखल करण्याची शक्यता आहे. पहिल्‍या वर्षामध्‍ये गुजरात, महाराष्‍ट्र, हैदराबाद आणि कर्नाटक येथे ५० हून अधिक दालने (Stores) दाखल करण्‍यात येतील. प्रथम व द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये आणि जिल्‍हा मुख्‍यालयांमध्‍ये हे विस्‍तारीकरण करण्‍यात येईल. तसेच लिव्‍हप्‍युअरची अत्‍याधुनिक उत्‍पादने जसे वॉटर प्‍युरिफायर्स, किचन अप्‍लायन्‍सेस आणि एअर कूलर्स भारतातील अधिकाधिक कुटुंबांसाठी उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेतली जाईल. युनिवन ग्रुपचे ओम्‍नीचॅनेल वितरण व रिटेल ऑपरेशन्‍समधील कौशल्‍य या महत्त्वाकांक्षी विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे.


'लिव्‍हप्‍युअरने नेहमी नाविन्‍यता आणि ग्राहक स्‍वास्‍थ्‍याला प्राधान्‍य दिले आहे. स्‍वत:ला वॉटर प्‍युरिफायर्समधील लीडर म्‍हणून स्‍थापित करत आहे. अवघ्‍या दोन वर्षांमध्‍ये आम्‍ही किचन अप्‍लायन्‍सेस आणि एअर कूलर्समधील टॉप ब्रँड बनलो आहोत. या सहयोगाच्या माध्यमातून असे लिव्‍हप्‍युअरचे व्‍यवस्‍थापकीय संचालक राकेश कौल यांनी सांगितले. 'युनिवन ग्रुपसोबतच्या करारामुळे त्यांच्या रिटेल नेटवर्कचा फायदा होईल. तसेच यामुळे ओम्‍नीचॅनेल विस्‍तारीकरणाप्रती युनिवन च्‍या एकात्मिक दृष्टिकोनाचा फायदा कंपनीला होईल असे कंपनीने म्हटले आहे. ज्‍यामधून लिव्‍हप्‍युअरची उत्‍पादने अद्वितीय गती व मोठ्या प्रमाणासह ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्‍ध असण्‍याची खात्री मिळते' असेही ते म्हणाले आहेत.


युनिवन ग्रुपचे प्रवक्ता सौरभ झवेरी म्‍हणाले, 'आज भारतातील ग्राहक सर्वोत्तम ब्रँड अनुभवांचा शोध घेत आहेत. मल्‍टी-ब्रँड आऊटलेट्सऐवजी विशेष स्‍टोअर्सना प्राधान्‍य देत आहेत, जेथे ते ब्रँडच्‍या संपूर्ण श्रेणीशी संलग्‍न होऊ शकतात. लि व्‍हप्‍युअरसोबतचा हा सहयोग दर्जा व नाविन्‍यता वितरित करण्‍याप्रती आमच्‍या समान कटिबद्धतेला दृढ करतो, तसेच लिव्‍हप्‍युअरला भारतातील सर्वसमावेशक रिटेल क्षेत्रात ओम्‍नीचॅनेल लीडर म्‍हणून स्थित करतो. लिव्‍हप्‍युअरचा व्‍यापक उत्‍पा दन पोर्टफोलिओ शाश्‍वतता व दर्जावर लक्ष केंद्रित करत डिझाइन करण्‍यात आला आहे, जो स्‍वास्‍थ्‍य-केंद्रित सोल्‍यूशन्‍ससाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करतो. १ दशलक्षहून अधिक आनंदी ग्राहक आणि संपूर्ण भारतात १,००० हून अधिक प्रमा णित इंजीनिअर्सचे पाठबळ असलेल्‍या वितरण नेटवर्कसह लिव्‍हप्‍युअर उद्योगामध्‍ये मापदंड स्‍थापित करत आहे. कंपनीची लिव्‍हप्‍युअरला भारतातील कुटुंबांना आरोग्‍य, सोयीसुविधा व स्‍वास्थ देण्‍यासाठी पसंतीचा ब्रँड बनवण्‍याचे ध्येय आहे. हा सहयोग भारतातील रिटेल क्षेत्राला नवीन आकार देण्‍यामध्‍ये महत्त्वपूर्ण पाऊल आहे, तसेच विश्‍वसनीय मार्केट लीडर म्‍हणून लिव्‍हप्‍युअरच्‍या पोझीशनला अधिक दृढ करत आहे. युनिवन ग्रुपचे रिटेल कौशल्‍य आणि लिव्‍हप्‍युअरची नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने यांना एकत्र करत हा सहयोग दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्‍यास सज्‍ज आहे, तसेच देशभरातील ग्राहकांना स्‍वास्‍थ्‍य-केंद्रित सोल्‍यूशन्‍स अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देईल.'

Comments
Add Comment

इस्रायलचे अधिकाऱ्यांसह सैनिकांना कुराण आणि अरबी भाषा शिकण्याचे आदेश

जेरुसलेम : इस्रायलकडून मोसादचे अधिकारी आणि आपल्या सैनिकांसाठी एक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार आता

आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने गोदावरी नदी स्वच्छतेसह रस्ते पुलांची कामे नियोजित वेळेत करण्यात यावी: पंकज भुजबळ

पुरवणी मागण्यांवर चर्चा करतांना आमदार पंकज भुजबळ यांची सभागृहात मागणी  मुंबई: नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या

'निस्तार' भारतीय नौदलात दाखल, पहिले स्वदेशी पाण्याखालील मदतकार्य करणारे जहाज

विशाखापट्टणम : 'निस्तार' हे स्वदेशी रचना आणि निर्मिती असणारे पाण्याखाली उतरून मदतकार्य करणारे पहिलेच जहाज

मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो

सर्व ७ तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या ७२.६१ टक्के जलसाठा मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा

OnePlus Nord 5 विरुद्ध Poco F7 5G: मिड-रेंज फ्लॅगशिपची सविस्तर तुलना

मुंबई : आज लाँच झालेला OnePlus Nord 5 आणि जून २०२५ मध्ये बाजारात आलेला Poco F7 5G या दोन शक्तिशाली स्मार्टफोनमुळे भारतातील

ऑनलाइन गेममध्ये हरल्याने, १६ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक: ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याने १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना नाशिक रोड परिसरामध्ये घडली आहे.