Jio Recharge Plan : 'जिओ धन धना धन'...फक्त १०० रुपयांत मिळणार ९० दिवसांची व्हॅलिडीटी!

या युजर्ससाठी बेस्ट आहे Jio चा हा रिचार्ज प्लॅन


रिलायन्स जिओ भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओचे भारतात कोट्यावधी युजर्स आहे. त्यामुळे आपल्या युजर्सच्या फायद्यासाठी आणि नवीन युजर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमीच नवीन रिचार्ज प्लॅन सुरु करत असते. सध्या भारतातील टेलिकॉम कंपन्या जास्त व्हॅलिडीटी आणि बेनिफिट्स देणारे रिचार्ज प्लॅन त्यांच्या युजर्ससाठी लाँच करत आहेत. यामध्ये बीएसएनएल,(BSNL) जियो,(JIO) एयरटेल (AIRTEL) आणि वोडाफोन(VODAFONE) आइडिया या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या त्यांच्या युजर्सासाठी १०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतचे रिचार्ज प्लॅन लाँच करत असतात. या प्लॅनमध्ये युजर्सना कॉलिंग, मेसेजिंग आणि इंटरनेट डेटासह अनेक फायदे ऑफर केले जातात. यातील अनेक प्लॅन्स युजर्सच्या बजेटमध्ये देखील असतात.



Jio प्लॅन लाँच 


आता आम्ही तुम्हाला अशाच एका बजेट प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनची किंमत केवळ १०० रुपये आहे, या प्लॅनमध्ये ९० दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. हा प्लॅन भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने लाँच केला आहे. ज्या युजर्सना कमी बजेटमध्ये जास्त दिवसांची व्हॅलिडीटी पाहिजे आहे, अशा युजर्ससाठी हा प्लॅन सुरु करण्यात आला आहे. चला तर मग जिओने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनबद्दल आता जाणून घेऊया.



फक्त १०० रुपयांत मिळणार ९० दिवसांचा फायदा


जिओने त्यांच्या युजर्ससाठी १०० रुपयांच्या किंमतीत नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी ९० दिवसांची आहे. जिओचा हा बजेट फ्रेंडली प्लॅन ग्राहकांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. जिओचा हा परवडणारा रिचार्ज हा एक डेटा प्लॅन आहे जो युजर्सना ९० दिवसांसाठी डेटा बेनिफिट्स देतो. म्हणजेच तुम्ही केवळ १०० रुपयांच ९० दिवसांसाठी डेटाचा वापर करू शकणार आहात.



५ जीबी डेटा बेनिफिट


यूजर या ९० दिवसांसाठी मनसोक्त इंटरनेट डेटाचा आनंद घेऊ शकतात. जिओच्या या १०० रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एकूण ५ जीबी डेटा बेनिफिट दिला जाणार आहे. ५G कनेक्टिव्हिटी असलेल्या क्षेत्रात राहणारे युजर्स या प्लॅनच्या मदतीने अनलिमिटेड ५G डेटाचा लाभ घेऊ शकणार आहेत. याशिवाय, डेटा संपल्यानंतरही, तुम्ही कमी वेगाने इंटरनेटचा लाभ घेऊ शकाल. त्यामुळे ज्या युजर्सना इंटरनेट डेटाची जास्त आवश्यकता असते, अशा युजर्ससाठी हा प्लॅन अत्यंत उपयोगी ठरणार आहे.



फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन


१०० रुपयांच्या जिओच्या या रिचार्ज प्लॅनसोबत युजर्सना ९० दिवसांसाठी ओटीटी बेनिफिट्स ऑफर केले जाणार आहेत. फक्त १०० रुपयांच्या रिचार्जवर तुम्हाला एकूण ५ जीबी डेटा आणि जिओहॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. त्यामुळे हा रिचार्ज प्लॅन युजर्ससाठी प्रचंड फायद्याचा ठरणार आहे. कारण १०० रुपयांत तुम्हाला केवळ इंटरनेट डेटाच नाही तर ओटीटीचा देखील आनंद घेता येणार आहे. तुम्ही हा जिओ प्लॅन सध्याच्या प्लॅनसोबत वापरू शकणार आहात. तुम्ही सक्रिय प्लॅनसह जिओ १०० रुपयांचा प्लॅन स्वीकारू शकता.

Comments
Add Comment

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

HDFC Bank Update: दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या कर्ज पुरवठ्यात लक्षणीय वाढ

प्रतिनिधी: एचडीएफसी बँकेने आपल्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक माहिती एक्सचेंजला दिली आहे. त्यातील

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या