जगात सर्वाधिक मत्स्योत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी, महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका

  67

मुंबई : जगात सर्वाधिक मत्स्योत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारताच्या या कामगिरीत महाराष्ट्राची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. जो जगातील एकूण मत्स्यव्यवसाय उत्पादनापैकी सुमारे आठ उत्पादन एकट्या भारतामध्ये होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या मत्स्यव्यवसाय उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसाय उत्पादनाचे योगदान मोठे आहे. भारतीय मत्स्यव्यवसायाने २०२३ - २४ मध्ये ६०,५२३.८९ कोटी रुपयांचे १७,८१,६०२ मेट्रिक टन सागरी अन्न अर्थात सीफूड सीफूड निर्यात केले. ही वाढ मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा सर्वात मोठा पुरावा आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेतील मत्स्यव्यवसायाचे योगदान वाढवण्यात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती केली आहे. महाराष्ट्राचे सागरी मत्स्य उत्पादन २०२३ - २४ मध्ये ४,३४,५७४ मेट्रिक टन होते. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात राज्याचे मत्स्योत्पादन २०२४ - २५ मध्ये २९,१८४ मेट्रिक टनांनी वाढले आणि ४,६३,७५८ मेट्रिक टनांवर पोहोचले.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन कायदा, १९८१ (सुधारणा-२०२१) च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे, ड्रोन देखरेखीसह, राज्यात अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यास मदत झाली आहे. या उपाययोजनांमुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरेंच्या घरी जाणार उद्धव ठाकरे

मुंबई : गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत.

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण