Gold Silver Rate: सलग चौथ्या दिवशी सोन्याचा नवा उच्चांक ! सोने झाले 'स्वप्नवत'

प्रतिनिधी: कालचा रेकॉर्ड मोडत सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात शनिवारी आणखी वाढ झाली. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात आणखी एकदा झाल्याने सर्वसामान्यांसाठी सोने विकत घेणे हे स्वप्नवत वाटावे इतकी परिस्थिती आहे. ' गुडरिटर्न्स' या संकेतस्थळावरील माहितीनुसार, आज २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत २८ रूपयांनी वाढत १०१६८ रूपयांवर पोहोचली आहे. तर त्याची प्रति तोळा किंमत १०१६८० रूपयांवर पोहोचली आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत २५ रूपयांनी वाढत ९३२० रूपयांवर पोहोचली आहे  तर त्याची प्रति तोळा किंमत २५० रूपयांनी वाढत ९३२०० रूपये पातळीवर पोहोचली आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत २१ रूपयांनी वाढत ७६२६ रूपयांवर पोहोचली आहे तर प्रति तोळा दर ७६२६० रूपये पातळीवर पोहोचला आहे.


आज मुंबई, पुण्यासह इतर महत्त्वाच्या शहरात हीच परिस्थिती कायम आहे. दिल्ली (१०१८३), बडोदा (१०१७३), अहमदाबाद (१०१७३) वगळता इतर शहरात प्रति तोळा किंमत १०१६८० रूपये प्रति ग्रॅमवर पोहोचली आहे.


चांदीचे दर जैसे थे!


चांदीच्या दरात आज कुठलाही बदल झालेला नाही. कालप्रमाणेच प्रति किलो चांदीचे दर ११०००० रूपये आहे.


एमसीएक्सवर सोन्याचा बोलबाला -


एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याच्या निर्देशांकात ०.०४% आज वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा निर्देशांक (Index) १००३१४.०० पातळीवर पोहोचला आहे तर चांदीच्या एमसीएक्सवरील निर्देशांकात ०.०२ % घट झाली आहे तर निर्देशांक पातळी १०६४४७४.०० पातळीवर पोहोचली आहे. गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) मध्ये दुपारपर्यंत ३४५२.८० पातळी ओलांडली गेली होती. त्यामुळे या निर्देशांकात १.४८% वाढ झाली आहे.


का वाढत आहे सोने -


इस्त्राईलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर मध्यपूर्वेत दबावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच कच्च्या तेलाच्या निर्देशांकात ७.५०% वाढ झाल्याने कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. हीच परिस्थिती सोन्यासोबत आहे. बाजारात हेंजिग म्हणून सोने गुंतवणूकीत व मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मध्यपूर्वेतील इराणवरील हल्ल्यांनंतर इराण तेलाच्या पुरवठ्यात कपात करू शकतो. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगाने होत असल्याने सोने वधारत आहे.


अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीत अपेक्षेपेक्षा कमी घट झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी नफा कमावल्याने सोन्याच्या किमती ०.२% ने घसरून ९६,७०४ प्रति १० ग्रॅम झाल्या. मे महिन्याचा वार्षिक ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) २.४% वर आला ज्याचे भाकीत २.५% पेक्षा कमी गेले होते. तर कोअर (मुख्य) चलनवाढ २.८% वर स्थिर राहिली. या आकडेवारीमुळे यूएस फेडरल रिझर्व्ह सप्टेंबरच्या सुरुवातीलाच दर कपात (Federal Reserve Bank Rate Cut) सुरू करू शकेल अशी अपेक्षा बळावली, ज्यामुळे डॉलर आणि अमेरिकन उत्पन्न मंदपणे वाटचाल करत आहेत. पारंपारिकपणे सोन्यासाठी तेजी, जरी नफा-बुकिंगने (Profit Booking) नफ्यावर मर्यादा घातली आहे असे तज्ञांचे मत आहे. देशांतर्गत, सोन्याच्या किमती वाढल्यामुळे मागणी कमी झाली. भारतीय व्यापाऱ्यांना प्रति औंस $५६ पर्यंत सवलती वाढवाव्या लागल्या - गेल्या एका महिन्यातील सर्वाधिक - कारण स्थानिक किमतींमध्ये विक्रमी वाढ झाल्याने किरकोळ विक्रीत घसरण झाली होती.

Comments
Add Comment

आरबीआयकडून जपानच्या दिग्गज सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनला भारतात बँकिंग व्यवसायासाठी मान्यता

मोहित सोमण: आरबीआयने सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (SMBC) या जापनीज कंपनीला भारतात बँकिग व्यवसायासाठी आपली

Tejasvee Ghosalkar : मतदानाच्या दिवशी तेजस्वी घोसाळकर भावूक! आज शारीरिकदृष्ट्या अभिषेक सोबत नसले, तरी...

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असताना, दहिसरमधील वॉर्ड क्रमांक २ मध्ये एक अत्यंत

Maharashtra Election 2026 Voting : आज दारू मिळणार? बँका सुरु आहेत का? आज काय काय सुरु आहे? वाचा संपूर्ण यादी

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी

आज शेअर बाजार व कमोडिटी बाजार सुरु राहणार का? 'ही' आहे माहिती

प्रतिनिधी: आज दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी शेअर बाजार बंद

BMC Elections : ही सुट्टी म्हणून घरात बसून राहू नका...; नाना पाटेकरांचे मतदारांना कळकळीचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र आज एका मोठ्या राजकीय वळणावर उभा आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २,८६९ जागांसाठी आज मतदान

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.