एका उंदराने केले संपूर्ण शहराचे पाणीबंद, लोकांचे झाले मोठे हाल


चक्क एका उंदरामुळे संपूर्ण संभाजीनगरचा पाणीपुरवठा तब्बल 7 तास बंद झाला होता.




संभाजीनगर: उंदरामुळे काय घडेल आणि काय नाही याचा नेम नाही. अलिकडेच पुण्यातील एका प्रसिद्ध नाट्यगृहाचे उंदीर प्रकरण ताजे असताना, आता  छत्रपती संभाजीनगरामधून एक विश्वास न बसणारी बातमी समोर आली आहे. चक्क एका उंदरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा तब्बल 7 तास बंद झाला होता.


एका उंदरामुळे संभाजीनगरचा पाणीपुरवठा तब्बल 9 तास खंडित झाला होता. त्यामुळे पाणी न मिळाल्याने गुरूवारी रहिवाशांचे मोठे हाल झाले. जायकवाडी धरणातील नवीन पारोळा पंपगृह येथील पंपगृहात उंदीर शिरल्यामुळे दोन्ही फेस एकत्र होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा तब्बल 9 तास बंद होता. परिणामी अनेक भागात आज पाणी मिळू शकले नाही. शनिवारी देखील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.


नवीन फारोळा पंपगृह येथील इन्कमर 2 मध्ये स्पार्क होऊन पहाटे 4:25 वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यानंतर सर्व इन्कमर पॅनलची तपासणी केली असता इन्कमर 2 मध्ये उंदीर शिरल्यामुळे फेस टू फेस होऊन पंपिंग ट्रिप झाली झाल्याचे आढळून आले. उंदीर पॅनल बाहेर काढून ट्रायल घेते वेळेस सबस्टेशन मधील सप्लाय स्टँड होत नसल्याने ट्रान्सफॉर्मर चेकिंग काम करण्यासाठी तब्बल 9 तास लागले, त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद असल्यामुळे आज पाणीपुरवठा होऊ शकला नाही तर उद्याच्या पाणीपुरवठ्यावर देखील मोठा परिणाम होणार आहे.


महत्वाचं म्हणजे या अगोदर देखील काही महिन्यांपूर्वी एका सापामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. डीपीमध्ये साप गेल्याने यंत्रणेत बिघाड झाला  होता आणि त्याचाही परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला होता. वारंवार होणाऱ्या अशा तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून, पाणीपुरवठा यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments
Add Comment

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘वंदे भारत’च्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या सविस्तर

पुणे: सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतील अनेक

विवाहासाठी दिव्यांगांना आता मिळणार अडीच लाख रुपये, राज्य सरकारचा मोठा निर्णय

सोलापूर : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, दिव्यांग आत्मनिर्भर बनावा, विवाहापासून

निकालाआधी अनगरमध्ये भाजपने उधळला गुलाल! पहिल्यांदाच निवडणूक आणि बिनविरोध निवड

सोलापूर : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असली तरी ही निवडणूक

पुणे-महाबळेश्वर ई-शिवाई बस सुरू

पुणे : स्वारगेट आगारातर्फे महाबळेश्वरसाठी वातानुकूलित ई-शिवाई बस सेवा सुरू केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला अपघात

अमरावती : अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतले आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला

Crime News : जमिनीचा तुकडा की रक्ताचा सडा? अर्ध्या गुंठ्यासाठी पोटच्या गोळ्याने जन्मदात्यांचे डोके ठेचले; हुपरी हादरली! सैतानी क्रूरता

हुपरी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात एका माथेफिरू मुलाने केवळ मालमत्तेच्या वादातून आपल्या वृद्ध