पश्चिम रेल्वे अहमदाबाद-मुंबई आणि अहमदाबाद-दिल्ली दरम्यान चालवणार विशेष ट्रेन

मुंबई :पश्चिम रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता अहमदाबाद-मुंबई आणि अहमदाबाद-दिल्ली जं. दरम्यान अतिजलद विशेष ट्रेन चालवणार आहे


१. ट्रेन क्रमांक ०९४९४/०९४९३ अहमदाबाद – मुंबई सेंट्रल सुपरफास्ट स्पेशल
ट्रेन क्रमांक ०९४९४ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट स्पेशल गुरुवार १२ जून रोजी अहमदाबाद येथून रात्री ११. ५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८. १० वाजता मुंबई सेंट्रल पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०९४९३ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल शुक्रवार १३ जूनला मुंबई सेंट्रल येथून सकाळी ११.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ७. ३० बजे अहमदाबाद पोहोचेल. हि ट्रेन दोन्ही दिशेला आणंद, वडोदरा, भरूच, सूरत, वापी आणि बोरी स्टेशन्सवर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी ३-टियर आणि एसी चेयर कार क्लास कोच आहेत.



२. ट्रेन क्रमांक ०९४९७/०९४९८ अहमदाबाद - दिल्ली जंक्शन - अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल
ट्रेन क्रमांक ०९४९७ अहमदाबाद-दिल्ली जंक्शन. ही सुपरफास्ट स्पेशल गाडी गुरुवार, १२ जून रोजी रात्री ११. ४५ वाजता अहमदाबादहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता दिल्ली जंक्शनला पोहोचेल.त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९४९८ दिल्ली जंक्शन-अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल दिल्ली जंक्शन येथून शुक्रवार, १३ जून रोजी अहमदाबादहून ५. ३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता अहमदाबादला पोहोचेल. हि ट्रेन दोन्ही दिशांना महेसाणा, पालनपूर, अबू रोड, मारवाड जंक्शन, अजमेर, जयपूर, अलवर, रेवाडी, गुडगाव आणि दिल्ली कँट स्थानकावर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी ३-टायर कोच असतील.

Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५