विजय रुपाणी आणि 1206 क्रमांकाचे अनोखे कनेक्शन

अहमदाबाद : ज्या आकड्यांनी भाग्य उजळले त्याच आकड्यांसोबत आयुष्य संपले... ऐकायला अजब वाटेल पण हा प्रकार गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासोबत घडला आहे. विजय रुपाणी 1206 हा आकडा स्वतःसाठी लकी नंबर समजत होते. यामुळे जिथे शक्य होईल तिथे त्यांनी हाच नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला होता. रुपाणींकडे असलेल्या सर्व वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये 1206 हा आकडा हमखास असायचा. कायम 1206 हा आकडा स्वतःसाठी लकी समजणाऱ्या रुपाणींचा मृत्यू झाला १२ जून या दिवशी म्हणजेच पुन्हा एकदा 1206. अनेक वर्ष ज्या आकड्यांच्या मदतीने भाग्य उजळले त्याच आकड्यांसोबत त्यांचे आयुष्य संपले.

एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान गुरुवार १२ जून रोजी दुपारी अहमदाबादहून लंडनच्या दिशेने रवाना झाले. उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात हे विमान कोसळले. या विमानात असलेल्या २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी होते. त्यांचाही अपघातात मृत्यू झाला. विजय रुपाणी त्यांच्या लंडनमध्ये नातलगांकडे गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी म्हणून जात होते, असे समजते. त्यांचा विमानातील आसन क्रमांक 2D असा होता. ते विमानात बसल्यानंतर एका महिला प्रवाशाने सेल्फी काढला होता. ही प्रवासी महिला रुपाणी जिथे बसले होते त्या पुढील रांगेतील खुर्चीत होती. तिने काढलेल्या सेल्फीत रुपाणी दिसत आहेत. हा सेल्फी, विमानाची तिकीट आणि बोर्डिग पास यावरुन रुपाणी विमानात होते हे निश्चित झाले होते. नंतर अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आली.

एरवी विजय रुपाणी 1206 हा आकडा स्वतःसाठी लकी समजत होते. पण यंदाच्या वर्षातील सहाव्या महिन्याच्या बाराव्या तारखेला म्हणजे पुन्हा एकदा 1206 असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला आणि विमान जिथे कोसळले त्या भागातील काही नागरिकांचाही मृत्यू झाला. यामुळे अपघातात ठार झालेल्यांची एकूण संख्या २६५ झाली आहे. या अपघातात ठार झालेल्यांच्या नातलगांना टाटा समुहाकडून एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच टाटा समूह जखमींच्या उपचारांचा खर्च करणार आहे. विमान ज्या कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले त्या कॉलेजला हॉस्टेल नव्याने बांधण्यासाठीही मदत करणार असल्याचे टाटा समुहाकडून सांगण्यात आले.

रुपाणी पत्नीसह लंडनमध्ये एका कौटुंबिक सहलीसाठी जाणार होते. पण लुधियाना पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. पंजाब भाजपाचे प्रभारी असल्यामुळे रुपाणींनी पत्नीला लंडनला पाठवण्याची व्यवस्था केली पण स्वतः भारतात थांबले होते. प्रचाराचे काम संपल्यानंतर पत्नीला परत आणायचे आणि त्या निमित्ताने लंडनमधील ओळखीच्या लोकांना भेटून घ्यायचे म्हणून रुपाणी प्रवासाला निघाले होते. पण दुर्दैवाने त्यांच्यासाठी हाच शेवटचा प्रवास ठरला.
Comments
Add Comment

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.

Maithili Thakur Win Bihar Election 2025 : वय फक्त २५… अन् ११ हजारांच्या आघाडीने विक्रमी विजय; बिहारला मिळाली सर्वात तरुण आमदार! काय म्हणाली मैथिली?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत २०२५ (Bihar Election Result 2025) मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकतर्फी वर्चस्व

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी

तेजस्वी यादव विजयी, तर तेजप्रताप पराभूत

पटना : बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीए २४३ पैकी २०२ जागांसह विक्रमी विजयाकडे वाटचाल करत आहे, तर

मुस्लीमबहुल भागात एनडीएची सरशी

पटना : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने

पर्यावरणवादी पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांचे निधन

वयाच्या ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : प्रसिद्ध पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या