Shani Shingnapur Devsthan : शनि शिंगणापूर देवस्थानमधून १६७ कर्मचाऱ्यांची कामावरुन हकालपट्टी!

११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश


सकल हिंदू समाजाच्या आंदोलनानंतर घेतला निर्णय


अहिल्यानंगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानने आपल्या १६७ कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. यामध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अनियमितता आणि शिस्त पालन न केल्याच्या कारणावरुन या कर्मचाऱ्यांची गच्छंती केल्याचे शनि देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आले. देवस्थानातील ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांना हटवण्याबाबत सकल हिंदू समाज आंदोलनाच्या पवित्र्यात होता.


श्री क्षेत्र शनि शिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरुन वाद वाढला होता. शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरुन काढून टाकावे अशी संघटनेची मागणी होती. अन्यथा १४ जून रोजी मंदिराबाहेर संपूर्ण हिंदू समाजाकडून मोठा मोर्चा काढला जाईल, असा इशारा देखील दिला होता.



गेल्या २१ मे २०२५ रोजी मुस्लिम कारागिरांनी मंदिराच्या पवित्र व्यासपीठावर ग्रिल बसवले आणि भगवान शनिदेवाच्या व्यासपीठाची स्वच्छता आणि रंगरंगोटी केली होती. तेव्हा हे प्रकरण अधिकच तापले होते. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता मंदिराच्या विश्वस्त मंडळाने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंदिर ट्रस्टने स्पष्टीकरण दिले होते, त्यानुसार ट्रस्टमध्ये ११४ मुस्लिम कर्मचारी काम करतात हे मान्य केले आहे. मात्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, या कर्मचाऱ्यांपैकी एकाही मुस्लिम कर्मचाऱ्याची ड्युटी मंदिराच्या मुख्य गर्भगृहात किंवा चबुतऱ्यावर नाही. हे कर्मचारी मुख्यतः शेती विभाग, कचरा व्यवस्थापन विभाग आणि शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत. यापैकी ९९ कर्मचारी मागील ५ महिन्यांपासून कामावर अनुपस्थित असून त्यांच्या पगारावरही आळा घालण्यात आला आहे.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई