Ahmedabad Plane Crash : पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये, केली अपघातस्थळाची पाहणी तसेच जखमींची विचारपूस आणि मृतांच्या नातलगांचे सांत्वन

अहमदाबाद : एअर इंडिया कंपनीचे AI 171 अहमदाबाद - लंडन हे बोईंग ७८७ - ८ ड्रीमलायनर विमान गुरुवार १२ जून २०२५ रोजी दुपारी उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात कोसळले. या अपघातात विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यापासून पंतप्रधान सतत मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. आज म्हणजेच शुक्रवार १३ जून रोजी पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधानांनी अपघातातील जखमींची विचारपूस केली तसेच मृतांच्या नातलगांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अपघातस्थळी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला.





ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानात 11 A या सीटवर बसलेला भारतीय वंशाचा इंग्रज नागरिक रमेश विश्वासकुमार आश्चर्यकारकरित्या वाचला. छाती, डोळे आणि पायांना थोड्या दुखापती झाल्या असल्या तरी रमेश सुरक्षित आहे. सध्या रमेश अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सामान्य वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. पंतप्रधान मोदींनी रमेश यांची भेट घेतली.

हाती आलेल्या माहितीनुसार, विमानातील २४१ जणांचा आणि ज्या ठिकाणी विमान कोसळले तिथे काही नागरिकांचा मृत्यू झाला. उड्डाण केल्यानंतर विमान काही सेकंदांतच विमानतळाजवळच्या मेघानीनगर येथील मेडिकल कॉलेजच्या मेस बिल्डिंगला आदळले. यानंतर अतुल्यम हॉस्टेलला हे विमान आदळले. यामुळे विमानाचे आगीच्या गोळ्यात रुपांतर झाले. चहूबाजूने धुराचे लोट येऊ लागले. आतापर्यंत एकूण २६५ जणांचा मृत्यू झाल्याचे अहमदाबाद पोलसांनी सांगितले. मृतांमध्ये मेडिकल हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार विमानातील एकूण २४२ प्रवाशांमध्ये, १६९ भारतीय प्रवासी, ५३ ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे ७ आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते. या शिवाय १२ क्रू मेंबर्स असल्याची माहिती समोर आली आहे. अधिक माहितीनुसार यामध्ये २ नवजात बाळ, ११ लहान मुले, २१७ प्रौढ प्रवासी प्रवास करत होते.

अपघातग्रस्त विमानात महाराष्ट्राचे सात जण होते. यात चार केबिन क्रू आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : अपर्णा महाडिक (खासदार सुनील तटकरे यांचा भाचा अमोल यांची पत्नी आहेत.) महादेव पवार, आशा पवार, मयूर पाटील, मैथिली पाटील, दीपक पाठक आणि शनी सोंघरे. याशिवाय, राजस्थानमधील पाच प्रवाशांचाही या अपघातात मृत्यू झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले.
Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या

भारत-ब्रिटनमध्ये 'व्हिजन २०३५' वर निर्णायक चर्चा! PM मोदी 'या' खास पाहुण्याचं करणार स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा पहिला भारत दौरा; फिनटेक आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष मुंबई: पंतप्रधान