साई मंदिरात आता हार-फुले नेता येणार

तदर्थ समितीचा निर्णय


शिर्डी : काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून समजल्या जाणाऱ्या साईनगरीत साईभक्तांना साई समाधी मंदिरात फुल हार व प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली होती मात्र गुरुवारी १२ जून रोजी साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने फुल, हार व प्रसाद बंदीचा निर्णय घेतला असून भाविकांची लूट थांबवण्याकरिता पूजेचे साहित्य खरेदी केल्याची पावती प्रवेश द्वारा जवळ दाखवल्यानंतरच साई भक्तांना फुल हार प्रसाद नेण्यास मंदिरात परवानगी मिळणार असल्याने या निर्णयाचे साई भक्त व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. कोरोना काळात साई मंदिरात फुल हार व प्रसाद बंदी केल्यानंतर दोन ते तीन वर्ष शिर्डीतील फुल विक्रेते व परिसरातील फुल उत्पादक यांना आर्थिक वर्षाचा मोठा सामना करावा लागला होता.


हार- फुल व प्रसाद बंदी उठवण्याकरिता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांनी न्यायालयीन लढा उभारून साई मंदिरात फुल हार व प्रसाद बंदीचा निर्णय उठवून फुल उत्पादक शेतकरी व फुल विक्रेते यांना मोठा आधार दिला होता. शिर्डीतील काही दुकानदार फुल हार व प्रसाद याची किमतीपेक्षा जादा दराने विक्री करून भाविकांची लूट करीत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर शिर्डीत ग्रामस्थांनी या दुकानदारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला तसेच भाविकांची होणारी लूट थांबण्याकरिता डॉ सुजय विखे पाटील यांनी देखील व्यवसायिकांची बैठक घेऊन त्यांना दुकानासमोर दर फरक लावण्याच्या सूचना केल्या होत्या.


याबाबत नगरपरिषदेला देखील सदर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. फुलहार प्रसाद अनेक वर्षानंतर सुरू होताच काही महिन्यातच काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर बंदुकीच्या साह्याने हल्ला करून त्यांना ठार केले होते.काश्मीर येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या विविध देश व राज्यातून भाविकांची सुरक्षाची काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने साई मंदिरात फुल हार व प्रसाद नेण्यास बंदी केली होती त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी या निर्णयामुळे आर्थिक दृष्ट्या पुन्हा खचला होता.


तसेच शिर्डीतील छोटे व्यवसायिक देखील फुल हार प्रसाद बंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडले होते.साई मंदिरात फुल हार व प्रसाद नेण्यास परवानगी द्यावी याकरिता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता.अखेर गुरुवारी १२ जून रोजी साईबाबा संस्थानच्या तथर्थ समितीने फुल हार व प्रसाद बंदीचा निर्णय उठवण्याचा निर्णय घेऊन भाविकांची पूजेच्या साहित्यापासून होणारी लूट थांबवण्याकरिता साई मंदिरात भाविकांना पूजेचे साहित्य घेऊन जाण्यापूर्वी ज्या दुकानात पूजेचे साहित्य खरेदी केले त्या दुकानचे पूजेचे साहित्य खरेदी करण्याचे बिल मंदिर प्रवेशद्वाराजवळ दाखवल्यानंतरच साई समाधी मंदिरात त्या भाविकाला फुल हार व प्रसाद नेण्यास प्रवेश दिला जाईल असा निर्णय घेतल्याने साई भक्तांकडून जादा दराने पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना या निर्णयाने चाप बसणार असून या निर्णयामुळे भाविकांची होणारी लूट थांबणार आहे. साई संस्थांनी प्रथमच इतिहासात हा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे भाविकांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह