Cropic Initiative : पिकांच्या अभ्यासासाठी आता एआय! काय आहे ​CROPIC योजना?

  58

नैसर्गिक संकटाशी झुंझणाऱ्या बळीराजानं जर शेती करताना एआय तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पन्नात वाढ होऊ शकते. हा विचार करून भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ​क्रॉपिक योजना आखली आहे​. या माध्यमातून ​ शेतीमधील पिकांची हंगामादरम्यान चार ते पाच वेळा छायाचित्रे ​घेतली जातील. ​ए​आय आधारित मॉडेल्स वापरून पीक माहिती गोळा ​केली जाईल. पिकांची वाढ योग्य आहे का? किडीचा प्रादुर्भावासाठी काय करावं? खत, पाणी किती द्यायला हवं याचा अभ्यास केला जाणार आहे.

?si=ihO3AHi5eHhKCpSL

​ ​CROPIC म्हणजे ​​कलेक्शन ऑफ रिअल टाइम ऑब्झर्वेशन्स अँड फोटो​ग्राफ्स ऑफ ​क्रॉप्स. या योजनेच्या माध्यमातून पिकांचे​ फोटो घेतले जातील. त्या आधारे हंगामाच्या मध्यात होणाऱ्या संभाव्य नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी ​ विश्लेषण के​लं जाईल.​ ​खरीप २०२५ आणि रब्बी २०२५-२६​ या हंगामासाठी अभ्यास करण्यात येणार असल्याचं सांगता येत आहे. ​CROPIC ​ नावाचं मोबाईल ​ॲप आहे. ​ते केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ​विकसित केलय. या अभ्यासात मोबाईल ॲप्लिकेशन वापरून पीक हंगामात शेतातील छायाचित्रे गोळा करण्याचा​ सरकारचा विचार केला आहे. ​



शेतातील छायाचित्रे थेट शेतकऱ्यांकडून घेतली जातील. त्यानंतर, पिकाचा प्रकार, पिकाची अवस्था, पिकाच​ नुकसान आणि त्याची​ व्याप्ती यासारख्या माहितीसाठी ​त्याचं विश्लेषण केले जाईल. CROPIC मॉडेल फोटो विश्लेषण आणि माहिती काढण्यासाठी AI-आधारित क्लाउड प्लॅटफॉर्म आणि व्हिज्युअलायझेशनसाठी वेब-आधारित डॅशबोर्ड वापर​णार आहे. ​महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा शेतकऱ्यांना भरपाई किंवा विमा द्यावा लागेल, तेव्हा अधिकारी CROPIC मोबाईल अॅप वापरून छायाचित्रे गोळा करतील.

अभ्यासाचा उद्देश काय आहे?


​केंद्रीय कृषी मंत्रालया​नं पंतप्रधान पिक विमा योजनेचा म्हणजे PMFBY अभ्यास करण्याची योजना आखली आहे. यामुळं पिक नुकसान किती झालं याचा अंदाज येईल. तसेच त्याला नुकसान भरपाई देण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असं सरकारला वाटतयं.​ "CROPIC हा​ PMFBY अंतर्गत एक उपक्रम आहे ​. याचा​ उद्देश पीक आरोग्य आणि ​नुकसानीचं निरीक्षण कर​णं. पंचनामा झाल्यानंतर ​स्वयंचलित पद्धतीनं तंत्रज्ञान आणि फोटो-अ‍ॅनालिटिकल मॉडेल्स वापरून बाधित शेतकऱ्यां​च्या विमा दाव्यांचे पेमेंट कर​णं, असा दुहेरी उद्देश​ असल्याचं सांगितलं जातयं. यंदापासून ​खरीप व रब्बी हंगामात किमान ५० जिल्ह्यांमध्ये क्रॉपिक​ योजना सुरू केली जाणार आहे.​ शेतीतील उत्पादन वाढवण्यास मदत करणाऱ्या नव्या योजनेसाठी एकूण ८२५ कोटी रुपये खर्च ​केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं