संगमनेरात दहशत व लुटमार करणाऱ्या टोळ्या जेरबंद

  63

१ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त


संगमनेर : संगमनेर शहरातील अकोले नाका व परिसरात नागरिकांना मारहाण करुन लुटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने लुटमार करणाऱ्या २ टोळ्या जेरबंद केल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार १५० रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या कारवाईचे संगमनेरकरांनी कौतुक केले आहे.


याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर शहरातील अकोले नाका व परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची काही गुंड प्रवृत्तीचे इसम दिवसा ढवळ्या लुटमार करत होते. ह्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली होती. अखेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस पथकाची नेमणूक केली आणि त्यांनी साई शरद सुर्यवंशी (वय २० वर्षे), राहुल भरत सोनवणे (वय २४ वर्षे), आदित्य संपत सुर्यवंशी (वय २७ वर्षे, तिघे रा. अकोले नाका, संगमनेर ता.संगमनेर, जि. अहिल्यानगर), पिल्या उर्फ विक्रम रामनाथ घोडेकर (वय २७ वर्षे रा पंपिंग स्टेशन, ता संगमनेर, जि. अहिल्यानगर), सिध्दार्थ दीपक मावस (वय २२ वर्षे, रा.अरगडे गल्ली,खांडगाव,ता.संगमनेर,जि.अहिल्यानगर), प्रशांत उर्फ परशा दिपक मावस (वय १९ वर्षे, रा अरगडे गल्ली, खांडगाव, ता.संगमनेर जि. अहिल्यानगर), सौरभ पप्पु खर्डे वय १९ वर्षे, रा गणेशवाडी, खांडगाव, ता.संगमनेर, जि. अहिल्यानगर) या सात जणांना अटक केली. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा असे विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या उघडकीस आले आहे. यामध्ये त्यांच्या कडून दरोडा टाकुन व गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.


यामध्ये १० हजार रुपये किंमतीचे चांदीचे मुख व पाठीमागुन पितळी मुलामा असलेले देव चार नग,४ हजार रुपये किंमतीचे पितळी दिवटे, तम्हन, तांब्या, ताट असे पुजेचे साहित्य,एक चाकू, ६० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ६५० रोख रक्कम, १५०० रुपयांच्या नोटा, एक चॉपर व चार काठ्या असा एकूण १ लाख ५५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कामगिरी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, संगमनेर विभागाचे पोलिस उप अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, संतोष पगारे, पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार, संदिप शिरसाठ, अजित कुऱ्हे, संतोष बाचकर, सुरेश मोरे, अतुल उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकातील पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी केली आहे. दरम्यान पोलीस पथकाने केलेल्या या धडक कारवाईचे संगमनेरकरांनी कौतुक केले असून यामुळे आता अकोले नाका व परिसरात होणाऱ्या लूटमारीच्या घटनांना मोठा आळा बसणार आहे.

Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या