प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ६,७३१ सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर

लवकर सदनिका प्रकल्पबाधितांना सुपूर्द करण्याचे निर्देश


मुंबई  : प्रकल्पबाधित कुटुंबांच्या निवासासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुलुंड (पूर्व) येथे ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प’ अंतर्गत सुमारे ३० हजार ९५४ चौरस मीटर क्षेत्रफळावरील ५ इमारतींमध्ये ६ हजार ७३१ सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. या सदनिकांचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करावे. जेणेकरून, त्या लवकरात लवकर प्रकल्पबाधितांना सुपूर्द करता येतील. तसेच, प्रकल्पाच्या ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.



मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प’ अंतर्गत मुलुंड (पूर्व) येथे प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येत असलेल्या सदनिकांची भूषण गगराणी यांनी गुरुवारी १२ जून २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी उपायुक्त संजोग कबरे, संबंधित अधिकारी तसेच कंत्राटदार आदी यावेळी उपस्थित होते.


प्रकल्पबाधित नागरिकांच्या निवासासाठी महानगरपालिकेच्या वतीने मुलुंड (पूर्व) येथे ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प’ अंतर्गत सुमारे ३०, ९५४ चौरस मीटर क्षेत्रफळावर ५ इमारती बांधण्यात येत आहेत. यामध्ये, तळमजला अधिक २२ मजल्यांच्या ४ इमारती तर तळमजला + २५ मजल्याच्या एका इमारतीचा समावेश आहे. या ५ इमारतींमध्ये मिळून एकूण ६ हजार ७३१ सदनिका प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येत आहेत.


प्रत्येक सदनिकेचे क्षेत्रफळ ३०० चौरस फूट असून त्यामध्ये बैठक, शयनकक्ष, स्वयंपाकघर, सामाईक स्वच्छतागृह यांचा समावेश आहे. तसेच, प्रकल्पाच्या परिसरात मनोरंजन मैदान, शाळा, सामुदायिक सभागृह, वाचनालय, आरोग्य केंद्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आदी सुविधांही पुरवण्यात येणार आहेत.


या पार्श्वभूमीवर, बांधकामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी डॉ भूषण गगराणी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यामध्ये त्यांनी सदनिकांच्या आतमधील संरचना; पाणी, स्वच्छतागृह, वीज, उद्वाहन (लिफ्ट), पायऱ्या, अग्निसुरक्षाविषयक उपाययोजना आदींची गुणवत्ता तसेच त्यासंबंधित महत्त्वपूर्ण बाबींची अत्यंत बारकाईने पाहणी केली आणि एकंदर प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.


दरम्यान, प्रकल्पाच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या दर्जेदार सुरक्षाविषयक बाबींसाठी भारतीय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प’ यास सन २०२३ वर्षीचा ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दलही त्यांनी संबंधितांचे कौतुक केले.

Comments
Add Comment

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर

मालाडमधील फोर डायमेंशन इमारतीला आग

मुंबई: मालाड पश्चिम येथील माइंडस्पेसजवळ लिंक रोडवरील फोर डायमेंशन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी आग लागली. मुंबई

मुंबईच्या काळाचौकी परिसरात रक्तरंजित थरार!

प्रेमभंगातून तरुणाचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, नंतर स्वतः केली आत्महत्या मुंबई : मुंबईतील काळाचौकी भागात एक खूप

हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले

मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी