हैदराबाद : चित्रपटाच्या सेटवर पाण्याची टाकी फुटून अनेक जखमी

हैदराबाद : हैदराबादच्या शमशाबादजवळ राम चरण निर्मित आगामी 'द इंडिया हाऊस' सिनेमाच्या अ‍ॅक्शन सीन शूट करताना सेटवरील मोठी पाण्याची टाकी अचानक फुटल्याने सेटवर पूरासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सेट अस्ताव्यस्त झाला. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले.





'द इंडिया हाऊस' सिनेमाच्या सेटवर अचानक ओढवलेल्या या अपघातामुळे अनेक क्रू मेंबर्स जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, एक असिस्टंट कॅमेरा मॅन या दुर्घटनेत गंभीर जखम झाला. याशिवाय इतरांनाही किरकोळ जखमा झाल्या. सोशल मीडियावर टाकी फुटलेल्या क्षणांचे दृष्य व्हायरल झाले असून चित्रपटाचे इतर सेट्स आणि उपकरणं सुद्धा यामुळे खराब झाली आहेत. या दुर्घटनेच्या वेळेस सिनेमाचे मुख्य अभिनेते निखिल सिद्धार्थ आणि निर्माता-कलाकार राम चरण उपस्थित होते की नाही, यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


दरम्यान, या अपघातामुळे सिनेमाचं शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आले असून सध्या सुरक्षित उपाययोजना आणि जखमींच्या उपचारावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. 'द इंडिया हाऊस' हा सिनेमा १९०५ च्या काळातील क्रांतिकारक चळवळीवर आधारित असून, निखिल सिद्धार्थ प्रमुख भूमिकेत आहेत. अनुपम खेर, सई मांजरेकर आणि दिग्दर्शक राम वाम्सी कृष्णा यांचा सहभाग असल्याने या सिनेमाविषयी रसिकांच्या खूप अपेक्षा आहेत. तथापि, या दुर्घटनेचा पोलीस तपास करत असून सध्या शूटिंग तात्पुरतं थांबवण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे