'ताज लँड्स'मध्ये बंद दाराआड चाललंय काय ? महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळणार ?

मुंबई : उद्धव सेना ही राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या काही दिवस येत होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबईत 'ताज लँड्स' हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली. दोघांनी बंद दाराआड तासभर चर्चा केली. चर्चेविषयी सविस्तर माहिती देणे दोन्ही नेत्यांनी चतुराईने टाळले. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री आणि राज यांच्यातील चर्चेमुळे उद्धव सेना आणि मनसे यांची संभाव्य युती होण्याआधीच तुटल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वांद्र्यातील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये सकाळीच मनसे प्रमुख राज ठाकरे पोहोचले. थोड्या वेळाने तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. यानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोघांनी बंद दाराआड तासभर चर्चा केली. याआधी मागील दोन महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव सेना ही राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करणार असल्याची चर्चा होत होती. निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज यांनी युतीचा विचार करत असल्याचे संकेत दिले होते. मात्र दोन्ही पक्षांमध्ये युतीला पूरक अशी चर्चा झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर गुरुवार १२ जून रोजी सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीचा कार्यक्रम आधी जाहीर झालेला नव्हता. यामुळेच मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये झालेल्या चर्चेअंती उद्धव सेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चेचा दी एंड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीतून महायुतीसाठी काही चांगलं होणार असेल तर या भेटीचे आम्ही स्वागत करतो; असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या राजकीय चतुराईची कल्पना साऱ्यांना आहे आणि राज ठाकरे हे स्वतंत्र राजकीय विचारांचे आहेत. यामुळे काय चर्चा झाली किंवा काय ठरलं याचे अंदाज करण्यापेक्षा त्यांच्याकडून अधिकृतपणे काय सांगितलं जातं आणि कधी सांगितलं जातं याची वाट बघणेच योग्य होईल; असेही उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शिंदेंची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर या दोघांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे पुन्हा एकदा मनसे महायुतीत प्रवेश करणार का ? या चर्चेला उधाण आले आहे.
Comments
Add Comment

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान

महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च

महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीला राड्यांचे ग्रहण

मुंबई : महाराष्ट्रातील २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मंगळवार २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले. मतदानाची वेळ

महाराष्ट्रात किती नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती अखेर आकडा समोर, निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्याचा तर काही ठिकाणी नगर

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या