Stock Market News: शेअर बाजारात दबावाचा 'अंडरकरंट' सेन्सेक्स १३३.३४ तर निफ्टी ६७.२० अंशाने घसरला

मुंबई : आज सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात बीएसई सेन्सेक्स (Sensex) निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स १३३.२४ अंशाने घसरून ८२३८१.९० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांकातही ६७.२० अंशाने घसरण होत निर्देशांक २५०७०.९० पातळीवर पोहोचला आहे. काल अखेरच्या सत्रात बँक निर्देशांकात घसरण कायम राहिल्याने बाजारात सपोर्ट लेवल (Support Level) राखण्यास मदत झाली नाही. परिणामी बाजारात मर्यादित वाढ झाली होती.

सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टी (Gift Nifty) मध्ये घसरण झाल्याने त्यांचे पडसाद आज बाजारात पहायला मिळत आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात गेल्या २ दिवसातील पडझड कायम राहिली आहे. सकाळी सेन्सेक्स बँक निर्देशांक ०.०५ % घसरण होऊन पातळी ५६५२९.५५ पातळीवर पोहोचला. बीएसई (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३८% व ०.०८% घसरण झाली आहे. तर निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३१% व ०.४५% ने घसरण झाली आहे. विशेषतः आज तीन दिवस घसरलेला भारतीय अस्थिरता निर्देशांक (Volatility Index VIX) मात्र सकाळी ०.६९% पातळीवर पोहोचला आहे.

सकाळी बाजार उघडताना निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्ये सर्वाधिक वाढ हेल्थकेअर (१.१९%), मिडिया (०.९०%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.९१%) झाली आहे तर घसरण आयटी (१.०%),तेल व गॅस (०.५७%), रिअल्टी (०.५७%) समभागात (Shares) मध्ये झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ टानला प्लॅटफॉर्म (Tanla Platforms) (१०.५%), नवा (६.९९%), रेडिंगटन (४.११%), किर्लोस्कर ब्रदर्स (३.५%), टाटा टेलिकॉम (३.२८%), रेडिको खैतान (२.६६%), झी एंटरटेनमेंट (२.०४%), एशियन पेंटस (२.०१%), बजाज फिनसर्व्ह (१.८४%), ओएनजीसी (१.८४%), सनफार्मा (१.७४%) या समभागात झाली आहे तर नुकसान सी ई इन्फो सिस्टिम (८.२४%), वन ९७ (७.१८%), एचपीसीएल (४.२६%), बीपीसीएल (३.५८%), क्रिसील (२.६२%), सोनाटा सॉफ्टवेअर (२.४१%), भारत पेट्रोलियम (३.४१%), इंडियन ऑइल (२.०४%), जेल इंडिया (१.६७%), अदानी पॉवर (१.५४%), इन्फोसिस (१.४८%) या समभागात झाली आहे.

युएस हेडलाईन्स इन्फ्लेशन (महागाई दर) हा कमी होत २.४% व मुख्य महागाई दर (Core Inflation Rate) हा २.८% यावर मर्यादित राहिल्याने बाजारात महागाई व अतिरिक्त दबाव कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापारी संबंध, रशिया युक्रेन वाद, भारत - युएस डील, युएस- चीन व्यापार चर्चा या मुद्यांचा एकत्रित दबाव असला तरी आता अमेरिकेन टेरिफ विवाद संपुष्टात आला होता. त्यामुळे इतर देशांवर अतिरिक्त टेरिफ वाढवण्याच्या निर्णयाला न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्याने आता बाजारात संदिग्धता कायम आहे.

परकीय बाजारात एस अँड पी ५०० फ्युचर निर्देशांक ०.३% ने घसरला आहे तर आशियाई बाजारात निकेयी (NIKKEI 225)०.६१% व हेंगसेंग (Heng Seng) ०.३८ पातळीवर घसरला होता. आज शेअर बाजारातील वीआयएक्सची हालचाल पाहता अखेरच्या सत्रात बाजार कुठल्या दिशेने वाटचाल करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments
Add Comment

संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची संविधानाच्या डिजिटल चित्ररथाद्वारे मानवंदना

संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन  मुंबई: राज्य

भारत व रशिया यांच्यातील अणुभट्ट्या प्रकल्पांना वेग पुतीन व मोदी यांच्यात महत्वाची चर्चा

नवी दिल्ली: भारत व रशिया यांच्यातील संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही देश आता नव्या एकत्र येत

भारत-रशियामधील महत्त्वपूर्ण करारानंतर अमेरिकेत खळबळ! नवी नॅशनल सिक्योरिटी स्टॅटजी जारी करण्याचा राष्ट्राध्यक्षांचा निर्णय

अमेरिका: रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी पुतिन आणि

ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन... भाषणाची सुरुवात करताना लक्षात ठेवा 'हे' मुद्दे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. या

इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर

प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्राची संरचनात्मक कामे पूर्ण मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९