Ahmedabad plane crash: मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी एक हजाराहून अधिक DNA टेस्ट होणार - अमित शाह

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान क्रॅश झाले. या दुख:द घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ते म्हणाले भारत सरकार आणि गुजरात सरकारचे सर्व विभाग एकत्रितपणे बचावकार्यात सहभागी आहेत. या विमानात एकूण देश आणि विदेशातील २४२ जण होते. यात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्सचा समावेश होता. यात एका प्रवाशाचा जीव बचावल्याची माहिती मिळाली आहे. मी त्याला भेटून आलो आहे. मृत्यूचा आकडा डीएनए टेस्ट आणि ओळख पटल्यानंतर अधिकृतपणे जाहीर केला जाईल. गुजरात सरकारने सर्व विभागांना अलर्ट केले आहे. सर्वांनी एकत्रित मिळून बचाव कार्य चालू केले आहे.


अमित शाह म्हणाले, सव्वा लाख लीटर इंधन विमानात होते. उष्णता आणि तापमान खूप जास्त होोते. कोणालाही वाचवण्याची संधी मिळाली नाही. मी घटनास्थळीही जाऊन आलो. सर्वांना बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रवाशांचे जितके नातेवाईक येथे पोहोचले आहेत त्यांचे डीएनए घेतले जाणार आहे. साधारण १ हजाराहून अधिक डीएनए टेस्ट कराव्या लागतील आणि या सर्व टेस्ट गुजरातमध्येच होतील. डीएनए सँपल घेण्याची प्रक्रियाही लवकरच पूर्ण केली जाईल. यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द केले जातील.


केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले, एव्हिएशन डिपार्टमेंटने तपास वेगात सुरू केला आहे. याचा तपास वेगाने झाला पाहिजे असे आदेश मंत्र्‍यांना देण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे. हा एक अपघात होता. अपघाताला कोणी रोखू शकत नाही. मी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांप्रति संवेदना व्यक्त करतो.

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक