बदलापुरात २५० रोपांचे वाटप करून वटपौर्णिमा साजरी

मागील आठ वर्षांप्रमाणे यंदाही शिवसेनेने राबवला स्तुत्य उपक्रम


बदलापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या सुवर्ण सतीश साटपे यांच्या वतीने वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांना २५० रोपांचे वाटप करून वडाची पूजा करण्यात आली. शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक ७ च्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


मागील आठ वर्षे प्रभागात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये वटपौर्णिमेनिमित्त महिला मोठ्या प्रमाणात वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी विभागातील शिवशांती कॉम्प्लेक्स व भवानीशंकर बिल्डिंगजवळ येतात. या ठिकाणी आलेल्या महिलांना मागील आठ वर्षांपासून सातत्याने एक रोप वितरित केले जाते. मागील वर्षी या महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते. तुळस ही पूर्ण वेळ ऑक्सिजन देणारे झाड असून महिला दररोज तुळशीच्या झाडाची पूजा करतात यावर्षी आपण चार विविध प्रकारची रोपे आणून त्यांचे या महिलांना वाटप केले आहे.


यामध्ये प्रामुख्याने मनी प्लांट, तुळस व फायकस तसेच रिबीन ग्लास या इनडोअर व आउटडोर शोभेच्या रोपांचे वाटप करण्यात आले. काही रोपे ही शोभेची असून ती घराच्या आत मध्ये किंवा घराच्या बाहेर या दोन्ही ठिकाणी ठेवता येऊ शकतात. यापूर्वी वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते कारण वटपौर्णिमेनिमित्ताने महिला बाजारातून वडाची तोडलेली फांदी घेऊन येतात व त्याची पूजा करतात. याचा बोध घेऊन आपण वडाच्या रोपाचे वाटप केले होते ज्यामुळे महिलांनी त्या रोपाचे घरी संगोपन करून पुढच्या वर्षी त्याचीच पूजा करावी हा या मागचा हेतू असतो.


यावेळी विभागातील महिलांनी मागील वर्षी वाटप केलेल्या झाडाच्या आठवणी सांगितल्या. त्या झाडाला आमच्या बाल्कनीत, आमच्या घरात कुंडीमध्ये लावले आहे आणि त्याची जोपासनाकरीत आहोत अशा आठवणी यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी सांगितल्या.

Comments
Add Comment

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून