Raja Raghuvanshi Murder Case: सोनमने स्वतः पतीचा मृतदेह दरीत फेकला! राजा रघुवंशी हत्याकांडप्रकरणी सर्वात मोठा खुलासा

मेघालय: राजा रघुवंशी हत्याकांडातील (Raja Raghuvanshi Murder) सर्वात मोठा खुलासा समोर येत आहे. तो म्हणजे, राजा रघुवंशीच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह दरीत फेकून देण्यात सोनम रघुवंशीचा (Sonam Raghuvanshi) देखील हात आहे. शिलाँगचे डीआयजी डेव्हिस एनआर मार्क यांनी पहिल्यांदाच या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचा खुलासा झाला आहे. व्हिस एनआर मार्क यांच्यामते, केवळ तीन आरोपींनीच नाही तर सोनम रघुवंशीने देखील राजाचा मृतदेह उचलला आणि दरीत फेकून दिला. हे सर्व एका सुनियोजित कटाच्या अंतर्गत घडवून आणले गेले आहे. 


पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, घटनेच्या दिवशी तिन्ही कॉन्ट्रॅक्ट किलर्स दोन स्कूटरवरून आले होते. हत्येनंतर, दोन मारेकरी एका स्कूटीवर तर सोनम आणि एक मारेकरी दुसऱ्या स्कूटीवर बसले.  आणि त्यानंतर सर्वजण घटनास्थळापासून १० किमी अंतरावर दूर गेले. याचा अर्थ असा होतो की, हत्येदरम्यान आणि हत्येनंतरही सोनम संपूर्ण वेळ या मारेकऱ्यांसोबत होती आणि राजाचा मृतदेह लपवण्यात सहभागी होती.



हत्याकांडाबद्दल सोनम - राज यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप


डीआयजी यांनी पुढे सांगितले  की, सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे, परंतु जेव्हा या हत्येचा सूत्रधार कोण आहे असा प्रश्न पडला तेव्हा दोघांनीही एकमेकांवर आरोप करायला सुरुवात केली. हा आरोप-प्रत्यारोप आता पोलीस तपासासाठी एक नवीन आव्हान बनलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनम आणि राजा यांच्याकडे एकूण चार मोबाईल फोन होते. परंतु आतापर्यंत फक्त एकच फोन सापडला आहे. उर्वरित तीन मोबाईल अजूनही बेपत्ता आहेत, जे या प्रकरणाचे गूढ उकलण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. डीआयजी डेव्हिस एन आर मार्क यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.


यापूर्वी, शिलाँगच्या एसपींनी एक मोठा खुलासा केला आणि दावा केला की मेघालय पोलिसांकडे सोनम रघुवंशी आणि इतर आरोपींविरुद्ध ठोस पुरावे आहेत, जे या हत्येत सहभागी असल्याचे सिद्ध करतात. मेघालय पोलिसांनी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा यांना समोरासमोर आणले, त्यानंतर सोनमने देखील तिचा पती राजा रघुवंशीच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याची कबुली दिली.



मेघालय पोलिसांच्या 'ऑपरेशन हनिमून' अंतर्गत मिळालेले पुरावे 


मेघालय पोलिसांच्या 'ऑपरेशन हनिमून' अंतर्गत २३ मे रोजी शिलाँगच्या सोहरा येथे राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहा यांची समोरासमोर बसवून चौकशी केली. तपासात ४२ सीसीटीव्ही फुटेज, आकाश राजपूतचे रक्ताने माखलेले जॅकेट, सोनमचा रेनकोट आणि गुवाहाटी रेल्वे स्थानकाजवळून जप्त केलेले हत्येचे शस्त्र असे भक्कम पुरावे समोर आले. या पुराव्यांच्या दबावामुळे सोनमचे  बिंग फुटले आणि तिने सर्वकाही खरं सांगून टाकलं. तिने राज कुशवाहा आणि तीन कॉन्ट्रॅक्ट किलर आकाश राजपूत, विशाल उर्फ ​​विकी ठाकूर आणि आनंद कुर्मी यांच्यासोबत राजाला मारण्याचा कट रचल्याचे कबूल केले.



हत्येनंतर दिशाभूल करण्याचा प्रयत्न 


पोलिस तपासात असे दिसून आले की सोनम हनिमूनच्या बहाण्याने राजाला सोहराच्या एका निर्जन भागात घेऊन गेली. पूर्वनियोजित कटानुसार, कॉन्ट्रॅक्ट किलर्सनी राजाची हत्या केली. त्यानंतर काही वेळातच सोनमने राजाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दुपारी २:१५ वाजता 'सात जन्मों का साथ है' पोस्ट करून तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये सोनमला घटनास्थळापासून १० किलोमीटर अंतरावर मारेकऱ्यांशी बोलताना पाहिले. मेघालय पोलिसांनी सोनम, राज कुशवाह आणि तिन्ही कॉन्ट्रॅक्ट किलर्सना अटक केली आहे. सोनमने ९ जून रोजी गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले. एसपी विवेक यांनी सांगितले की,  "आमच्याकडे सर्व आरोपींविरुद्ध पूर्ण पुरावे आहेत. आम्ही या कटाचा अधिक खोलवर तपास करत आहोत, जेणेकरून कोणताही अँगल चुकणार नाही."

Comments
Add Comment

पालघर नगरपरिषद निवडणुकीत आघाडीत बिघाडी !

महायुतीमध्येही पडली उभी फूट पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या तीन नगरपरिषदेसह एका नगरपंचायत

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे

कुठे काका विरुद्ध पुतण्या, तर कुठे दादा, भावजयी रणांगणात

नगर परिषद निवडणुकीत ‘घर घर की कहानी’ गाजणार मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर

अनगरमध्ये भाजपचा एकहाती विजय! १७ पैकी १७ उमेदवार बिनविरोध निवडून

अनगर : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. भाजपने सर्व

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

'भाजप काँग्रेसचा सर्वाधिक आमदारांचा विक्रम मोडणार'

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर, देशभरात भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे.