मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. खरीप हंगामाची तयारी केलेली असतानाच अचानक पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. मात्र, आता (दि.१३) जूनपासून पुन्हा एकदा राज्यात मान्सूनचे जोरदार कमबॅक होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून, राज्यातील एकूण १३ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे असून, मुसळधार पाऊस बरसण्याचे भाकीत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या पावसामुळे राज्यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.तसेच शेतीपिकांनाही मोठा फटका बसला होता.


त्यानंतर आता जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली आहे. साधारणपणे राज्यात १५ जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते. मात्र, यावेळी मान्सून लवकर दाखल झाला होता. त्यामुळे पाऊस लवकर सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.



'या' जिल्ह्यांना अलर्ट


यलो अलर्ट – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, मुंबई आणि ठाणे


ऑरेंज अलर्ट – पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग