Oswal Pumps IPO: ओसवाल पंप्सचा आयपीओ १३ जूनपासून बाजारात! ५८४ ते ६१४ रूपये Price Band निश्चित

प्रतिनिधी: परवापासून गुंतवणूकदारांसाठी बाजारात नवीन आयपीओ दाखल होत आहे.ओसवाल पंप्स लिमिटेड (Oswal Pumps Limited) या कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात १३ जूनपासून दाखल होत आहे.१३ ते १७ जून या कालावधीत हा आयपीओ गुंतवणूकदारांना सबस्क्रिप्शन (Subscription)साठी खुला असणार आहे. ५८४ ते ६१४ रूपये प्रति समभाग (Share) एवढा प्राईज बँड (Price Band) निश्चित करण्यात आला आहे. कंपनीकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, हा आयपीओ अंदाजे २० जून पासून बीएसई व एनएसई बाजारात सूचीबद्ध (Listed) होऊ शकतो. किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) यांना या आयपीओत कमीत कमी १४०१६ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे ज्यामध्ये १४ समभाग गठ्ठा (Shares Lot) यांचा समावेश असेल.

आयआयएफएल (IIFL) कॅपिटल सर्विसेस लिमिटेड,एक्सिस बँक,सीएलसीए, जेएम फायनांशियल, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट या कंपन्या आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर (Book Leading Manager) म्हणून काम करतील तर एमयुएफजी फायनान्स (MUFG Finance) रजिस्ट्रारचे काम करणार आहे.

एकूण आयपीओतील पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (Qualified Institutional Investors) यांच्यासाठी ५० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी निश्चित करण्यात आला आहे तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के वाटा तर विना संस्थात्मक गुंतवणूकदार (Non Institutional Investors) यांच्यासाठी १५ टक्के वाटा उपलब्ध असणार आहे.कंपनीला ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत १०६७.३४ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता जो मार्च २०२४ पर्यंत ९७.६७ कोटी होता. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. कंपनीच्या मार्च २०२४ मधील ९७.६७ कोटींच्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये नफ्यात वाढ होत २१६.७१ कोटी रुपयांचा नफा कंपनीला झाला होता.ओसवाल पंप्सचा आयपीओ हा १,३८७.३४ कोटी रुपयांचा बुक-बिल्डिंग इश्यू आहे. मेनबोर्ड आयपीओमध्ये ८९० कोटी रुपयांच्या १.४५ कोटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि ४९७.३४ कोटी रुपयांच्या ८१ लाख शेअर्सची ऑफर-ऑफ-सेल (0FS) समाविष्ट आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनीच्या भांडवली खर्चासाठी, उपकंपनीतील इक्विटी गुंतवणूकीसाठी,जुनी थकबाकी चुकवण्यासाठी,तसेच उपकंपनीतील नवीन गुंतवणूकीसाठी,दैनंदिन काम काजासाठी करण्यात येणार आहे. ओपीएल (Oswal Pumps) ही सौर पंप क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे.तज्ञांच्या मते कंपनीच्या टॉप आणि बॉटम लाईन्समध्ये समाधानकारक आर्थिक वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून कंपनीच्या नफ्यात वाढ हे सौर पंप सेगमेंटमध्ये झालेल्या बदलामुळे झालेला आहे.

आयपीओनंतर कंपनी कर्जमुक्त होईल आणि नियोजित विस्तारामुळे पुढे तिचे उत्पन्न वाढेल असाही तज्ज्ञांचा कयास आहे. या क्षेत्रात अनेक कॉर्पोरेट्स प्रवेश करत असल्याने या सेगमेंटमध्ये गर्दी वाढत आहे. सुज्ञ गुंतवणूकदार मध्यम ते दीर्घकालीन कालावधीसाठी निधी ठेवू शकतात असा सल्ला काही तज्ञांनी दिला आहे.ओसवाल पंपस कंपनी ही हरियाणास्थित कंपनी असून २००३ मध्ये या कंपनीची स्थापना झाला होती. कंपनीची मुख्य उत्पादने घरगुती, शेतीविषयक, कारखान्यातील अवजारे,पंप, इलेक्ट्रिक मोटर्स, इलेक्ट्रिक पॅनल ही आहेत.
Comments
Add Comment

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये