Mutual Fund : मे महिन्यात एसआयपीत रेकॉर्डब्रेक वाढ तर एकगठ्ठा म्युचल फंडात घट'ही'आहेत कारणे !

  52

प्रतिनिधी:असोसिएशन ऑफ म्युचल फंड इन इंडिया (AMFI)ने म्युचल फंडचा डेटा प्रकाशित केलेला आहे.त्यानुसार मे महिन्यात म्युचल फंड (Mutual Fund) गुंतवणूकीत १३ महिन्यातील सर्वांत मोठी घट झाली आहे.सलग पाच महिन्यांत या माहितीनुसार लार्जकॅप मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठी घट झाली आहे.या तिन्ही प्रकारच्या समभागात (Shares) मध्ये गुंतवणूकीचा ओघ रोखला गेला आहे.इक्विटी समभागात (Equity Shares) मे महिन्यात १९०१३ कोटींची गुंतवणूक झाली आहे जी एप्रिल महिन्यात २४२६९ कोटी होती‌.तज्ञांच्या मते सुरुवातीच्या महिन्यातील तीव्र तेजी,वाढलेले मूल्यांकन,भारत-पाकिस्तान तणावासह मॅक्रो अडथळे आणि जागतिक चलनवाढीच्या अस्थिरतेचा परिणाम मे महिन्यातील गुंतवणूकीवर झाला आहे.बाजारातील मंदीमुळे ही घसरण झाली.


या घसरणीला आणखी एक कारण आहे.जरी एकगठ्ठा रकमेची म्युचल फंड गुंतवणूकीत घट झाली तरी म्युचल फंड एसआयपी (Systematic Investment Plan) मध्ये प्रचंड वाढ झाली आहे.ती अधिकृत आकडेवारीनुसार २६६८८ कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.एप्रिल महिन्यात डेट फंड (Debt Fund) या म्युचल फंडात १५९०८ कोटींची गुंतवणूक केली गेली असली तरी एकूण म्युचल फंड गुंतवणूकीत थेट २.१९ लाख कोटींची गुंतवणूक प्राप्त झाली आहे.


म्युचल फंड असेट अंडर मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन अंतर्गत मालमत्तेत (Asset Under Management) ३.५% टक्क्याने वाढत ७१.९ लाख कोटींवर पोहोचले आहे.वेगवेगळ्या मल्टी असेट अलोकेशन फंड (Multi Asset Allocation Fund) यामध्ये २९९७ कोटींची गुंतवणूक मे महिन्यात केली गेली आहे.जी एप्रिल महिन्यात २१०६ कोटी रुपये होती‌.याशिवाय गेल्या दोन महिन्यांत सोन्यातील गुंतवणूकीत वाढ झाल्याने लोकांनी म्युचल फंडातील पैसा सोन्यात परावर्तित केला होता.ज्यामुळे एकत्रित फंडाचा कल सोन्याकडे झुकला गेला.


याच कालावधीत गोल्ड ईटीएफमध्ये २९१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.परदेशात गुंतवणूक करणाऱ्या फंड ऑफ फंड्स (FoFs) मध्ये सर्वात कमी ४२ कोटी रुपये गुंतवणूक झाली होती.तर दुसरीकडे म्युचल फंड एसआयपी गुंतवणूकीत एप्रिल महिन्यातील २६६३२ कोटींच्या तुलनेत वाढ होत मे महिन्यात २६६८८ कोटीवर पोहोचली आहे. एकूण एसआयपीवर व्यवस्थापन अंतर्गत मालमत्तेत (AUM) मध्ये एप्रिलमधील १३.८९ कोटींच्या तुलनेत मे महिन्यात १४.६१ कोटींवर पोहोचली आहे.


मे २०२५ मध्ये म्युच्युअल फंड उद्योगाची निव्वळ व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (AUM) ७२.१९ कोटी रुपये होती जी एप्रिल २०२५ मध्ये निव्वळ व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (AUM)६९.९९ कोटी रुपये होती.मे महिन्यात नवीन एसआयपी गुंतवणूकदारांची नवी नोंदणी ५९ लाखांहून अधिक आकड्यात पोहोचली आहे.तर हे महिन्यात एसआयपीची संख्या मे महिन्यात ८.५६ कोटींवर गेली आहे जी एप्रिल महिन्यात ८.३८ कोटी होती.


तज्ञांच्या मते अलीकडच्या काळात मजबूत एसआयपी इनफ्लो सुरूच राहण्याची अपेक्षा आहे. विविध आर्थिक पातळीवर ही वाढ आणखी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एप्रिलपर्यंत भारतातील म्युच्युअल फंडांकडे अभूतपूर्व २.१५ ट्रिलियन रुपये होते. विश्लेषकांनी सांगितले आहे की विक्रमी उच्च रोख होल्डिंगवरून सध्या दिसून येतेय की निधी अधिक अनुकूल मूल्यांकनाची वाट पाहत आहे.

Comments
Add Comment

नवा मोबाईल घेण्याचा विचार करताय? तर हा आहे तुमच्यासाठी मस्त ऑप्शन

मोटोरोलाचा मोटो G96 5G भारतात लाँच मुंबई : मोटोरोला कंपनीने बुधवारी 9 जुलैला भारतात मध्यम श्रेणीतील ग्राहकांसाठी

इस्रायलचे अधिकाऱ्यांसह सैनिकांना कुराण आणि अरबी भाषा शिकण्याचे आदेश

जेरुसलेम : इस्रायलकडून मोसादचे अधिकारी आणि आपल्या सैनिकांसाठी एक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार आता

आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने गोदावरी नदी स्वच्छतेसह रस्ते पुलांची कामे नियोजित वेळेत करण्यात यावी: पंकज भुजबळ

पुरवणी मागण्यांवर चर्चा करतांना आमदार पंकज भुजबळ यांची सभागृहात मागणी  मुंबई: नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या

'निस्तार' भारतीय नौदलात दाखल, पहिले स्वदेशी पाण्याखालील मदतकार्य करणारे जहाज

विशाखापट्टणम : 'निस्तार' हे स्वदेशी रचना आणि निर्मिती असणारे पाण्याखाली उतरून मदतकार्य करणारे पहिलेच जहाज

मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो

सर्व ७ तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या ७२.६१ टक्के जलसाठा मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा

OnePlus Nord 5 विरुद्ध Poco F7 5G: मिड-रेंज फ्लॅगशिपची सविस्तर तुलना

मुंबई : आज लाँच झालेला OnePlus Nord 5 आणि जून २०२५ मध्ये बाजारात आलेला Poco F7 5G या दोन शक्तिशाली स्मार्टफोनमुळे भारतातील