कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून रहिवासी इमारतींना नोटिसा

नोटीस सत्र थांबले नाही, तर जनतेचे आंदोलन


कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून डोंबिवली एमआयडीसी निवासीमधील रहिवासी इमारतींना गेल्या काही दिवसांपासून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसा संरचनात्मक तपासणी आणि त्यानंतर तपासणीत इमारत धोकादायक झाली असेल तर तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, अशा नोटिसा अनेक इमारतींना, सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून मिळत असल्याने त्यात नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात कसूर केल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल तसेच कोणतीही दुर्घटना घडल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले असून आता यापुढे काय करायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.


एमआयडीसी निवासीमधील या रहिवाशी इमारतींना साधारण अंदाजे ३० ते ४० वर्षे झाली आहेत. त्यात येथे रासायनिक प्रदूषण असल्याने त्यातील लोखंडी सळ्या, सिमेंट काँक्रीट हे खराब झाले आहे. साहजिकच त्या इमारती दुरुस्तीला किंवा रिडेव्हलपमेंटला आल्या आहेत. काही इमारतींनी सोसायट्यांनी दुरुस्ती करून घेतल्या आहेत तर काहींनी पैशाअभावी व इतर प्रलंबित प्रश्न अभावी अद्याप दुरुस्ती करून घेतल्या नाहीत. या सर्व इमारतींचे भूखंड हे एमआयडीसीने ९५ वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिले आहेत. शिवाय यात एमआयडीसीकडून अनेक अटी, शर्ती टाकण्यात आल्या असल्याने रिडेव्हलपमेंट करण्यास मोठी अडचण निर्माण झाल्या आहेत.


डोंबिवली एमआयडीसीमध्ये नियोजन प्राधिकरण हे एमआयडीसीकडे असल्याने इमारतींची बांधकामे आणि बांधकाम पूर्णतेचा व भोगवटा प्रमाणपत्र हे देण्याचा अधिकार हा एमआयडीसीकडे आहे. त्यामुळे या नोटिसा खरे तर एमआयडीसीकडून दिल्या गेल्या पाहिजे होत्या. कल्याण- डोंबिवली महापालिकेकडून एमआयडीसी निवासी इमारतीमधील रहिवाशांना अशा नोटिसा देऊन घाबरवण्याचा प्रयत्न चालू केला असून जर या पावसाळ्याच्या तोंडावर हे नोटीस सत्र थांबले नाही तर येथील जनता ही रस्त्यावर उतरून सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार असल्याचे ठरविण्यातयेत आहे.

Comments
Add Comment

केडीएमसीच्या अत्रे नाट्यगृहात मुदत संपलेल्या कोल्ड्रिंकची विक्री

केडीएमसीच्या अत्रे नाट्यगृहात मुदत संपलेल्या कोल्ड्रिंकची विक्री कारवाई करण्याची नागरिकांची मागणी कल्याण

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व