तलासरीत अल्पवयीन मातांच्या प्रमाणात वाढ

  36

आरोग्य विभागात ४० अल्पवयीन मातांची नोंद

तलासरी : मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे झाल्याशिवाय त्यांचा विवाह करू नये असा कायदा असताना व कायज्ञाने बालविवाहावर बंदी असल्याने अनेक ठिकाणी बाल विवाह होत नाहीत, असे असले तरी तलासरीसारख्या आदिवासी भागात बाल विवाह होत नसले तरी अल्पवयातच प्रेम संबंधाने माता होण्याचे प्रमाण वाढले आहे.

प्रेम संबंधाने विवाह न करता अल्प वयातच तरुण-तरुणी एकत्र राहत असल्याने अल्पवयीन माताच्या प्रमाण तलासरी भागात मोठ्या प्रमाणात असले आरोग्य विभागाच्या दप्तरी मात्र ४० अल्पवयीन मातांची नोंद आहे. यामध्ये उधवा प्राथमिक आरोग्य केंद्र ०३ माता, वसा प्राथमिक आरोग्य केंद्र ०६ माता, सूत्रकार प्राथमिक आरोग्य केंद्र ११ माता, आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र २० माता, अशी आकडे वारी असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णीयांनी दिली.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाचा अभाव यामुळे अल्प वयातच मुली शिक्षण सोडून रोजगारासाठी बाहेर पडतात, तलासरी भागात रोजगाराच्या संधी नसल्या तरी बाजूच्या गुजरात राज्य, केंद्र शासित दादरा नगर हवेलीमध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. या कारखान्यात तलासरी, डहाणू तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मजूर कामाला जातो, या मजुरामध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त आहे, तेथे या अल्पवयीन मुलांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण होते पण या शोषणाकडे कोणाचेही लक्ष नाही. या समस्येला सामोर जाण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

लिपी आधी मरते, मग भाषा: दीपक पवार

वसई : "भाषा नंतर मरते, पण लिपी आधी मरते. तिच्या नियमित वापराची आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. माणसं, झाडं

वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भाजपच्या ५ मंडळ अध्यक्षांना पदोन्नती विरार : भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक जिल्हा असलेल्या वसई-विरारची जिल्हा

...अखेर वाड्यातील रस्त्याची खड्डे भरून दुरुस्ती सुरू

निंबवली मार्गावरील नागरिकांनी मानले आभार अनंता दुबेले कुडूस : वाडा तालुक्यातील निंबवली - पालसई हा रस्ता अत्यंत

‘उडता वसई-विरार’ रोखण्यासाठी जनजागृती अभियान

कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त विरार : मीरा भाईंदर- वसई विरार पोलिस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या नालासोपारा,

विरार–डहाणू चौपदरीकरणाचा वेग कासवगतीने

पालघर : विरार ते डहाणू रोडदरम्यानच्या पश्चिम रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण काम अपेक्षेपेक्षा खूपच संथ गतीने सुरू

मोखाडा नगरपंचायत रिक्त पदे; कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भार

‘कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे’ मोखाडा : मोखाडा नगरपंचायत ही आता रिक्त पदांची पंचायत झाल्याचे चित्र दिसत आहे.