अंधेरी सबवेला पाणी साचण्याची समस्या राहणार कायम

भूमिगत टाकी बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नाही


मुंबई  : मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले जाऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने पंपिंग स्टेशन तसेच विशेष पंपांची व्यवस्था केली जाते; परंतु आतापर्यंत हिंदमाता, मिलन सब वे येथील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवरील पाण्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असला तरी अंधेरी सबवेच्या ठिकाणी साचले जाणारे पावसाचे पाणी कायमच राहणार आहे. मोगरा नाल्यावर पंपिंग स्टेशनची उभारणी केल्यानंतर सन २०२७च्या पावसाळ्यात दिलासा मिळणार असला तरी प्रत्यक्षात ही समस्या कायमस्वरुपी सुटणारी नाही. हिंदमाता आणि मिलन सब वेच्या ठिकाणचे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये वळवले जात असले तरी अंधेरी सब वेच्या ठिकाणी अशाप्रकारे भूमिगत टाक्या बांधण्याचा मार्गच नसल्याने याठिकाणी मोठ्याप्रमाणात नाही पण काही प्रमाणात पाणी तुंबण्याची समस्या कायमच राहणारी आहे.


मुंबईत मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसात अंधेरी सब वेच्या ठिकाणी पाणी साचले गेले. या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने पंप बसवले जात असले तरी समुद्राच्या मोठ्या भरतीच्या वेळी पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यास विलंब लागतो आणि परिसरात आहोटी येईपर्यंत पाणी कायमच राहते.


या ठिकाणच्या पाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोगरा नाल्यावर पंपिंग स्टेशनच्या बनवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात मोगरा नाला पंपिंग स्टेशनचे काम प्रस्तावित केले होते. अंधेरीतील मोगरा नाल्यावर बांधण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनची जागा खासगी असून सीआरझेडमध्ये असल्याने पर्यावरणीय परवानगीअभावी मागील १९ वर्षांपासून काम रखडले. यासाठी महापालिकेने आतापर्यंत जागेची मुल्य म्हणून न्यायालयात ४५ कोटी रुपये भरले आहे.


याबाबतच्या परवानगी आल्यानंतर या पंपिंग स्टेशनच्या बांधकामाकरता निविदा मागवून या जुलै २०२१मध्ये कंत्राटदार निवडीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे १८ ते १९ वर्षांपासून अंधेरी ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपरिसर, मालपा डोंगरी ते वर्सोवा परिसरातील असलेली ही समस्या अजुनही कायमच राहणार आहे. त्यामुळे या पावसाळ्यातही अंधेररीवासियांना या समस्येला सामोरे जावे लागणार आहे अशी चिन्हे दिसत आहेत.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.