Ahilyanagar : अहिल्यानगर हादरलं! फाशीचे रील शूट केलं अन् झालं रिअल; प्रकृती चिंताजनक

  61

अहिल्यानगर: अहिल्यानगरमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगरमध्ये रील करणे जिवावर बेतल्याचे दिसून आले आहे. एका तरुणाने फाशी बनवण्याचे रील शूट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच दरम्यान त्याला खरोखरच फास बसला आहे. त्या युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. सध्याचा काळ हा डिजिटलचा आहे. सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे स्टंट केले जात आहेत. अशीच अहिल्यानगरमधील घटना घडल्याचं समोर आलेलं आहे.



या तरुणाची प्रकृती गंभीर असून, त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्यासाठी रील शूट करताना एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. फाशीचे रील शूट करत असताना त्या तरुणाला अचानक गळ्याला फास बसला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा जीव वाचला असला तरी त्याची प्रकृती गंभीर आहे.

Comments
Add Comment

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची जय्यत तयारी : प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुकांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. बुधवारी देशभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात

मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाची मनाई

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे उपोषण करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मराठा

मुख्यमंत्री फडणवीसांच्या ओएसडीने घेतली मनोज जरांगेंची भेट, मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य

बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक, विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते भिडले

बीड : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणी पुणे : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना मंडई, शनिपार, तुळशीबाग